Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Isaiah 12 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

स्तुतिगीत

1त्या दिवशी तुम्ही म्हणाल:“याहवेह, मी तुमची स्तुती करेन,जरी तुम्ही माझ्यावर रागावला होता,तरी तुमचा राग दूर झाला आहेआणि तुम्ही माझे सांत्वन केले आहे.

2निश्चितच परमेश्वर माझे तारण आहेत;मी भरवसा ठेवेन आणि घाबरणार नाही.याहवेह, याहवेह स्वतः माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत;ते माझे तारण झाले आहेत.”

3तारणाच्या विहिरींतूनतुम्ही आनंदाने पाणी काढाल.

4त्या दिवशी तुम्ही म्हणाल:“याहवेहची स्तुती करा, त्यांच्या नावाची घोषणा करा;त्यांनी जे काही केले आहे ते राष्ट्रांमध्ये माहीत होऊ द्या,आणि असे घोषित करा की, त्यांचे नाव गौरवान्वित आहे.

5याहवेहसाठी गीत गा, कारण त्यांनी गौरवशाली कार्ये केली आहेत;हे सर्व जगाला माहीत करून द्या.

6सीयोनच्या लोकांनो, मोठ्याने गर्जना करा आणि आनंद गीते गा,कारण इस्राएलचे महान पवित्र परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]