Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Isaiah 11 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

इशायापासून फांदी

1इशायाच्या बुंध्यापासून एक अंकुर निघून वर येईल;त्याच्या मुळांपासून एक फांदी येऊन ती फळ देईल.

2याहवेहचा आत्मा त्यांच्यावर विसावेल—शहाणपणाचा आणि समंजसपणाचा आत्मा,सल्ला आणि पराक्रमाचा आत्मा,ज्ञानाचा आत्मा आणि याहवेहच्या भयाचा आत्मा—

3आणि ते याहवेहचे भय बाळगण्यात आनंद मानतील.ते तोंडदेखला न्याय करणार नाहीत,किंवा कानाने ऐकलेल्या गोष्टीवरून ते निर्णय घेणार नाहीत.

4परंतु ते नीतिमत्त्वाने गरजवंत लोकांचा न्याय करतील,न्यायाने ते पृथ्वीवरील गरिबांसाठी निर्णय देतील.ते त्यांच्या मुखाच्या काठीने पृथ्वीवर हल्ला करतील;ते त्यांच्या ओठांच्या श्वासाने दुष्टांचा वध करतील.

5धार्मिकता त्यांचा कटिबंध असेलआणि विश्वासूपणा त्यांचा कंबरपट्टा असेल.

6लांडगा कोकऱ्याबरोबर राहील,चित्ता बकरीबरोबर झोपेल,वासरे आणि सिंह एकत्र राहतील;आणि एक लहान बालक त्यांचे मार्गदर्शन करेल.

7गाई अस्वलाबरोबर चरतील,त्यांची पिल्ले एकत्र झोपतील,आणि सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल.

8लहान बाळ नागाच्या गुहेजवळ खेळेल,आणि बालक विषारी फुरसे सर्पाच्या बिळात हात घालेल.

9माझ्या पवित्र पर्वतावर सर्वठिकाणीते कोणाचेही नुकसान किंवा नाश करणार नाहीत,कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहेतशीच पृथ्वी याहवेहच्या ज्ञानाने भरून जाईल.

10त्या दिवशी इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज म्हणून उभे राहील; राष्ट्रे त्यांच्याकडे एकत्र येतील आणि त्यांचे विश्रामस्थान गौरवशाली असेल. 11त्या दिवशी प्रभू अश्शूरमधून, इजिप्तच्या खालील भागामधून, इजिप्तच्या वरील भागामधून, कूशमधून, पथरोसमधून, एलाममधून, शिनारमधून, हमाथमधून आणि भूमध्यसागराच्या बेटांमधून त्यांच्या अवशिष्ट लोकांवर पुन्हा हक्क सांगण्यासाठी दुसऱ्या वेळेस त्यांचा हात पुढे करतील.

12राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उभा करतीलआणि इस्राएलच्या बंदिवासात गेलेल्यांना एकत्र करतील;पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातूनयहूदीयाच्या विखुरलेल्या लोकांना ते एकत्र जमवतील.

13एफ्राईमचा मत्सर नाहीसा होईल,आणि यहूदीयाच्या शत्रूंचा नाश होईल;एफ्राईमला यहूदाहचा मत्सर वाटणार नाही,किंवा यहूदाह एफ्राईमबरोबर शतृत्व करणार नाही.

14ते पश्चिमेला पलिष्ट्यांच्या उतारावर झेपावतील;एकत्र मिळून ते पूर्व दिशेकडील लोकांना लुटतील.एदोम आणि मोआब या देशांना ते जिंकून घेतील,आणि अम्मोनी लोक त्यांच्या अधीन होतील.

15याहवेह, इजिप्तच्या समुद्राचेआखात कोरडे करतील;होरपळणाऱ्या वाऱ्यानेते फरात नदीवर हात झटकून टाकतील.ते त्याचे सात ओढे पाडतीलजेणेकरून पायतणे घालूनही ती ओलांडता येईल.

16अश्शूरपासून त्यांच्या अवशिष्ट लोकांसाठीजेव्हा ते इजिप्तमधून आलेतेव्हा जसा इस्राएलसाठी केला होता,तसा एक राजमार्ग असेल.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]