Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 128 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

प्रवाशांचे आराधना गीत.

1जे याहवेहचे भय बाळगतात,आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, ते धन्य!

2तू आपल्या हातांनी केलेल्या श्रमाचे फळ खाशील;तू सुखी होशील व तुझे कल्याण होईल.

3तुझी पत्नी तुझ्या घरातसफल द्राक्षवेलीसारखी होईल;तुझी मुले तुझ्या मेजाभोवतीजैतुनाच्या रोपांसारखी होतील.

4होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांनाहाच आशीर्वाद असणार.

5याहवेह सीयोनातून तुला आशीर्वादित करो;तुझे आयुष्यभरतू यरुशलेमची समृद्धी बघशील.

6नातवंडाचे सुख लाभेल इतके दीर्घ आयुष्य तुला मिळो—इस्राएलास शांती लाभो.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]