Side by side with the Father's Heart Bible™ प्रवाशांचे आराधना गीत.
1“माझ्या किशोरावस्थेपासून त्यांनी माझ्यावर घोर अत्याचार केला आहे,”इस्राएल म्हणो;
2“माझ्या किशोरावस्थेपासून माझ्यावर घोर अत्याचार करण्यात आला आहे,तरीही त्यांना माझ्यावर विजय मिळविता आला नाही.
3शेतकर्याने नांगरल्याप्रमाणेत्यांनी माझ्या पाठीवर लांब लांब तासे काढली.
4परंतु याहवेह न्यायी आहेत;त्यांनी मला त्या दुष्टांच्या बंधनातून मुक्त केले.”
5सीयोनाचा द्वेष करणारे सर्वलाजिरवाणा पराजय होऊन परत जावोत.
6घरांच्या छपरावर उगविलेल्या गवतासारखे ते होवोत,जे अर्धवट वाढल्याबरोबर सुकून पिवळे पडते;
7कापणार्यांच्या हातात काहीही पडत नाही,की बांधणार्यांनाही पेंढ्या मिळत नाहीत.
8येणारे जाणारे लोक त्यांना असे न म्हणोत,“याहवेहचे आशीर्वाद तुम्हावर येवोत;आम्ही तुम्हाला याहवेहच्या नावाने आशीर्वाद देतो.”