Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 127 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

प्रवाशांचे एक आराधना गीत. शलोमोनाची रचना.

1याहवेहने घर बांधले नाही,तर बांधकाम करणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत;याहवेहने शहराचे रक्षण केले नाही,तर पहारेकर्‍यांचे जागणे व्यर्थ आहे.

2तुमचे पहाटे उठणेआणि रात्री उशीरापर्यंतअन्नप्राप्तीसाठी कष्ट करणे व्यर्थ आहे—कारण आपल्या प्रियजनांस याहवेहच शांत झोप देतात.

3मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे,प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे.

4तरुणपणी झालेली मुले,शूरवीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.

5ज्या पुरुषाचा भाताअशा बाणांनी भरलेला आहे, तो धन्य!असे पुरुष वेशीत आपल्या शत्रूशी न्यायालयात वाटाघाटी करतील,तेव्हा ते लज्जित होणार नाहीत.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]