Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Job 25 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

बिल्दद

1मग बिल्दद शूहीने उत्तर देत म्हटले:

2“प्रभुत्व आणि भय हे परमेश्वराचे आहे;तेच परमोच्च स्वर्गामध्ये शांती स्थापित करतात.

3त्यांच्या सैन्याची गणती करता येईल काय?आणि त्यांचा प्रकाश कोणावर पडत नाही?

4मग मर्त्य परमेश्वरासमोर कसा नीतिमान ठरेल?स्त्रीपासून जन्मलेला व्यक्ती पवित्र असू शकतो काय?

5जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाहीआणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत,

6मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे—मानवप्राणी, तो तर केवळ अळीप्रमाणे आहे!”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]