Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 23 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

दावीदाचे स्तोत्र.

1याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही.

2ते मला हिरव्यागार कुरणात विश्रांती देतात,ते मला संथपणे वाहणार्‍या झर्‍याजवळ नेतात.

3ते माझा जीव ताजातवाना करतात.ते आपल्या नावासाठीमला नीतिमार्गाने चालवितात.

4मृत्युछायेच्या दरीतूनहीमी जात असलो,तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही,कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात;तुमची आकडी व तुमची काठीमला धीर देतात.

5तुम्ही माझ्या शत्रूंच्या देखतमाझ्यापुढे ताट वाढता;तुम्ही माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक करता;माझा प्याला भरभरून वाहत आहे.

6खरोखर चांगुलपणा व करुणामयप्रीतीमजबरोबर आयुष्यभर असतील,आणि मी याहवेहच्या,घरात सदासर्वदा राहीन.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]