Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 6 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र.

1याहवेह, रागाने माझा निषेध करू नका,तीव्र क्रोधाने मला शासन करू नका.

2मजवर दया करा, कारण हे याहवेह, मी दुर्बल आहे;मला रोगमुक्त करा, कारण माझ्या हाडात तीव्र वेदना होत आहेत.

3माझा आत्मा अत्यंत यातनेत आहे.याहवेह, तुम्ही किती विलंब लावणार?

4याहवेह, परत येऊन मला सोडवा;तुमच्या दयेनुसार मला वाचवा.

5मृतलोकात तुमचे स्मरण नाही;गर्तेमध्ये तुमचे उपकारस्मरण कोण करणार?

6माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे.रात्रभर रडण्याने मी माझे अंथरूण भिजून ओलेचिंब करतो.माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजून जातो.

7दुःखाने माझे डोळे निस्तेज झाले आहेत;माझ्या शत्रूंमुळे माझी दृष्टी क्षीण झाली आहे.

8दुष्टाई करणार्‍यांनो, येथून चालते व्हा,कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे.

9याहवेहनी माझ्या दयेची याचना ऐकली आहे;याहवेह माझ्या प्रार्थना स्वीकार करतील.

10माझे सर्व शत्रू भय आणि लज्जा पावतील;ते मागे फिरतील आणि तत्काळ लज्जित होतील.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]