Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 11 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र.

1मी याहवेहचा आश्रय घेतला आहे.तर मग तुम्ही मला असे का म्हणत आहात:“पक्ष्याप्रमाणे तू आपल्या डोंगराकडे उडून जा,”

2कारण पाहा, दुष्टांनी आपली धनुष्ये वाकविली आहेत,त्यावर आपले बाण चढविले आहेतकी अंधारातून बाण मारूनसरळ मनाच्या लोकांची हत्या करावी.

3जर पायाच नष्ट झाला,तर नीतिमान काय करणार?

4परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत;याहवेह आपल्या स्वर्गीय सिंहासनावर विराजमान आहेत.त्यांची दृष्टी सर्व मनुष्यास पाहते;पृथ्वीवर प्रत्येकास ते पारखतात.

5याहवेह नीतिमानाला पारखतात;परंतु दुष्ट, ज्यांना हिंसा प्रिय आहे,अशांचा याहवेह आवेशाने द्वेष करतात.

6जळते निखारे आणि तप्त गंधकाचा पाऊस ते दुष्टांवर पाडतील;आपल्या दाहक वार्‍यानेत्यांना होरपळून टाकतील.

7कारण याहवेह नीतिमान आहेत,न्यायीपण त्यांना प्रिय आहे;जे नीतिमान आहेत, त्यांना त्यांचे दर्शन होईल.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]