Side by side with the Father's Heart Bible™ दावीदाचे स्तोत्र.
1याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल?तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?
2ज्याचे चालणे निर्दोष आहे,जो धार्मिकतेचे आचरण करतो,जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो;
3जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही,जो आपल्या शेजार्यांचे वाईट करीत नाही,आणि इतरांना काळिमा लावत नाही;
4जो कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो,याहवेहचे भय धरणार्यांचा सन्मान करतो,आणि जो स्वतःचे नुकसान होत असलेतरी दिलेले वचन पाळतो;
5जो व्याज न आकारता पैसे उसने देतो;जो निष्पाप लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही,जो कोणी या गोष्टी करतोतो कधीही ढळणार नाही.