Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 124 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.

1सर्व इस्राएलने हे कबूल करावे की—जर याहवेह आमच्या बाजूने नसते,

2जेव्हा मनुष्यांनी आमच्यावर आक्रमण केले होते,जर याहवेह आमच्या बाजूने नसते,

3तर त्यांचा संताप आमच्यावर भडकला असता.तेव्हा त्या शत्रूंनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते;

4जलप्रलयात आम्ही बुडून गेलो असतोव जलप्रवाहात आम्ही पार वाहून गेलो असतो,

5उचंबळलेल्या लाटांनी आम्हालागिळंकृत केले असते.

6याहवेह धन्यवादित असोत;त्यांनी आम्हाला शत्रूंचे भक्ष्य होऊ दिले नाही.

7पारध्याच्या पाशातून पक्षी निसटावा,त्याप्रमाणे आम्ही जिवानिशी निसटलो;पाश तुटलेला आहेआणि आम्ही मुक्त झालो आहोत.

8आमच्या साहाय्याचा उगम,स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते परमेश्वर, याहवेह यांचे नाव आहे.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]