Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 123 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

प्रवाशांचे आराधना गीत.

1मी माझी दृष्टी वर, तुमच्याकडे लावतो,तुम्ही जे स्वर्गात राजासनारूढ आहात.

2जसा एखादा दास आपली दृष्टी आपल्या धन्याच्या हाताकडे लावतो,किंवा एखादी दासी आपल्या धनिणीच्या हाताकडे नजर लावते,तसेच दया आणि कृपा प्राप्त व्हावी म्हणून,आमची दृष्टी आमचे परमेश्वर याहवेहकडे लागलेली असते.

3आम्हावर दया करा, हे याहवेह, आम्हावर दया करा,कारण आम्ही पुष्कळ तिरस्कार सहन केला आहे.

4उन्मत्त लोकांचा घोर उपहास आम्ही सहन केलाआणि गर्विष्ठांच्या घोर घृणेचेपात्र ठरलो आहे.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]