Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 1 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

पुस्तक 1

1धन्य ते लोक,जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत,किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत,आणि थट्टा करणार्‍यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.

2पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे,आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.

3ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्‍या जलप्रवाहाजवळ लावलेले असते,जे आपल्या ऋतूमध्ये फळ देतेआणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत.त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.

4परंतु दुष्ट तसे नाहीत.ते वार्‍याने उडून जाणार्‍याभुश्यासारखे आहेत.

5म्हणून दुष्ट न्यायसभेत,किंवा पापी लोक नीतिमानांच्या सभेमध्ये उभे राहणार नाहीत.

6कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात,परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]