Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 149 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

1याहवेहचे स्तवन करा.याहवेहसाठी एक नवे गीत गा,त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत.

2हे इस्राएला, आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव कर;अहो सीयोनकरांनो, आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावा.

3त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत,डफ आणि वीणा यांच्या संगीताच्या साथीवर स्तुती गा.

4कारण याहवेहला आपल्या लोकांमुळे संतोष होतो;ते नम्रजनांस विजयी करतात.

5या सन्मानामुळे त्यांचे सात्विक उल्लास करोतआणि आपल्या अंथरुणावर हर्षगीते गावोत.

6त्यांच्या मुखात परमेश्वराची आराधना असोआणि दुधारी तलवार त्यांच्या हातात धारण करून,

7राष्ट्रांसाठी त्यांनी नेमलेल्या शिक्षा अंमलात आणण्याससिद्ध व्हावे;

8त्या राष्ट्रांच्या राजांना बेड्या घालाआणि त्यांच्या पुढार्‍यांना लोखंडी साखळदंडानी बांधा.

9त्यांना दिलेल्या शिक्षांची अंमलबजावणी करा.हाच याहवेहच्या विश्वासू लोकांचा गौरव आहे.याहवेहचे स्तवन करा.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]