Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 137 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

1आम्ही बाबेलच्या नदीकाठावर बसलो आणिसीयोनाची आठवण करीत रडलो.

2आम्ही आमच्या वीणावाळुंजाच्या फांद्यावर टांगल्या,

3कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले,आमचा छळ करणार्‍यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली,ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!”

4या परदेशात आमच्या याहवेहचेस्तवनगीत गाणे आम्हाला कसे शक्य आहे?

5हे यरुशलेम, मी तुला विसरलो,तर माझा उजवा हात त्याचे कौशल्य विसरो;

6जर मी यरुशलेमला माझासर्वोच्च आनंद मानत नसेन,तर माझी जीभमाझ्या टाळूला चिकटो.

7हे याहवेह, माझ्या देवा, यरुशलेमचा पाडाव झालात्या दिवशी एदोमाच्या वंशजांनी काय केले याचे स्मरण करा.ते आरोळ्या मारत होते, “तिला जमीनदोस्त करा,तिचा पाया देखील ढासळून टाका.”

8अगे बाबेलच्या कन्ये, तुझा नाश निश्चित आहे;तू जसा आमचा नाश केलास,तसा तुझी परतफेड करणारा धन्य होईल.

9जो तुझी तान्ही बालके घेऊन,त्यांना खडकावर आपटेल, तो धन्य!

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]