Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 138 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

दावीदाचे स्तोत्र.

1हे याहवेह, मी माझ्या अंतःकरणापासून तुमचे उपकारस्मरण करेन;मी तुमची स्तुतिस्तोत्रे “दैवतांच्या” पुढे गाईन.

2उपासना करीत असताना, तुमच्या मंदिराकडे मी नतमस्तक होईन,आणि तुमच्या सर्व दयामय प्रीतीबद्दल आणि विश्वासूपणाबद्दल,तुमची उपकारस्तुती करेन,कारण तुम्ही तुमच्या वचनालातुमच्या किर्तीपेक्षा उंच केले आहे.

3जेव्हा मी हाक मारली, तुम्ही प्रत्युत्तर दिले;मला शक्ती देऊन खूप धैर्य दिले.

4हे याहवेह, पृथ्वीवरील सर्व राजे तुमचे उपकारस्मरण करतील,कारण यातील प्रत्येकजण तुमच्या मुखाचे निर्णय ऐकतील.

5ते याहवेहच्या गौरवशाली मार्गाचे गुणगान करतील,कारण याहवेहचे गौरव अतिथोर आहे.

6याहवेह महान असले तरी ते दीनांची दयेने काळजी घेतात;गर्विष्ठ लोकांना मात्र ते दुरूनच ओळखतात.

7मी संकटांनी वेढलेला असलो,तरी तुम्ही मला त्यातून सुखरुपपणे सोडविता;माझ्या संतापलेल्या शत्रूंवर तुम्ही आपला हात उगारता;तुमचा उजवा हात माझा बचाव करतो.

8याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील;परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे—आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]