Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Isaiah 15 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

मोआबा विरुद्ध भविष्यवाणी

1मोआब देशाविरुद्ध भविष्यवाणी:मोआब येथील आर शहर उद्ध्वस्त झाले आहे,एका रात्रीत ते नष्ट झाले आहे!मोआबातील कीर शहर उद्ध्वस्त झाले आहे,एका रात्रीत ते नष्ट झाले आहे!

2दिबोन येथील लोक त्यांच्या उच्च स्थानावरील,मंदिरात विलाप करण्यासाठी जात आहेत;नबो आणि मेदबासाठी मोआब आक्रोश करीत आहे.प्रत्येकाच्या डोक्यावरील केसआणि दाढी काढलेली आहे.

3रस्त्यांवर ते गोणपाट घालतात;छतावर आणि सार्वजनिक चौकांमध्येते सर्व आक्रोश करतात,विलाप करीत पालथे पडतात.

4हेशबोन आणि एलिआलेह रडतात,त्यांचा आक्रोश दूरवर याहसपर्यंत ऐकू येतो.म्हणून मोआबचे सशस्त्र लोक आक्रोश करतात,आणि त्यांची अंतःकरणे दुर्बल झाली आहेत.

5माझे मन मोआबसाठी रडते;तिचे पलायन केलेले लोक सोअरपर्यंत,एग्लाथ-शलीशियापर्यंत पळतात.ते लुहिथकडे टेकडीवर जातात,जाताना ते विलाप करतात;होरोनाईमच्या वाटेवरते त्यांच्या नाशासाठी विलाप करतात.

6निम्रीमचे सर्व पाणी आटून गेले आहेआणि गवत करपून गेले आहे;वनस्पती सुकून गेली आहे;आणि हिरवळीसारखे काहीही उरले नाही.

7म्हणून त्यांनी मिळवलेली आणि साठविलेली संपत्तीते वाळुंजाच्या खोऱ्यापलीकडे घेऊन जातात.

8त्यांच्या आक्रोशाचे प्रतिध्वनी मोआबच्या सीमेपर्यंत येतात.त्यांचे आक्रंदन एग्लाइमपर्यंत पोहोचते,त्यांचा विलाप बीर एलिमपर्यंत पोहोचतो.

9दिमोनाचे पाणी रक्ताने भरलेले आहे,परंतु मी दिमोनवर आणखी विपत्ती आणेन—मोआबच्या पलायन केलेल्या लोकांवरआणि देशातील अवशिष्ट लोकांवर मी सिंह पाठवेन.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]