Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 8 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

संगीत दिग्दर्शकासाठी. गित्तीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र.

1याहवेह, आमच्या प्रभो,संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे!स्वर्गदेखील तुमचेगौरव प्रकट करते.

2लेकरे आणि तान्ह्या बालकांच्या स्तुतीद्वारेतुमचे शत्रू व विरोध्यांना शांत करण्यासाठीशत्रूविरुद्ध बळ स्थापित केले आहे.

3जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्याआकाशाकडे बघून मी विचार करतो,चंद्र आणि तारे यथास्थानीस्थापित केलेले पाहतो,

4मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी?मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?

5तुम्ही त्यांना देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे.गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवला आहे.

6तुमच्या प्रत्येक हस्तकृतीवर तुम्ही त्यांना सत्ता दिली आहे;सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या.

7सर्व कळप व गुरे,आणि वनपशू.

8आकाशातील पक्षी,आणि समुद्रातील मासे,सागरात संचार करणारे सर्व प्राणी.

9याहवेह, आमच्या प्रभो,संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे!

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]