Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Jeremiah 47 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

पलिष्टी लोकांविषयी संदेश

1गाझा शहरावर फारोहने आक्रमण करण्यापूर्वी तेथील पलिष्टी लोकांविषयी याहवेहचे यिर्मयाह संदेष्ट्याला वचन आले ते असे:

2याहवेह हे असे म्हणतात:“पाहा, उत्तरेकडून जलस्तर उफाळून येत आहे;तो प्रचंड प्रवाहात परिवर्तित होईल.जो त्यांच्या भूमीला व तेथील सर्व गोष्टीला आच्छादित करेलम्हणजे त्यात असणारी नगरे व तिथे राहणारे.लोक किंकाळ्या मारतील;त्या भूमीवरील सर्व रहिवासी विलाप करतील.कारण त्यांच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज,शत्रूंच्या रथाचा आवाजआणि त्यांच्या चाकांचा खडखडाट ऐकू येत आहे.त्यांचे पालक वळून त्यांच्या मुलांना मदत करू शकणार नाहीत;त्यांचे हात गळून गेल्यागत झाले आहेत.

4कारण सर्व पलिष्टी लोकांचा नाश करण्यासआणि सर्व अवषेशांना बाहेर काढण्याचा,सोर व सीदोन येथील लोकांना मदत करण्याचासमय आला आहे.याहवेह पलिष्टी लोकांचा नाश करणार आहेत,कफतोरहून आलेल्या रहिवाशांचा निःपात करणार आहेत.

5गाझा विलापाचे चिन्ह म्हणून आपले मुंडण करेल;अष्कलोन पूर्णपणे निःशब्द होईल.अहो तुम्ही घाटातील अवशिष्ट लोकहो,तुम्ही केव्हापर्यंत स्वतःच्या देहास जखमी कराल?

6“ ‘हाय रे, याहवेहच्या तलवारी,तू पुन्हा केव्हा विसावा घेणार?जा! आपल्या म्यानात परत जा;शांत राहा व स्तब्ध हो.’

7परंतु जर याहवेहने तिला आज्ञा दिली आहे,तर ती स्वस्थ कशी बसेल,त्यांनीच तिला आदेश दिला आहे नाअष्कलोन व समुद्राकाठी राहणार्‍यांवर हल्ला कर?”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]