Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 18 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Whoever isolates himself pursues his own desire; he lashes out against all sound wisdom. मैत्रीहीन मनुष्य शेवटी स्वार्थ साधून घेतो आणि सर्व यथार्थ न्यायाविरुद्ध जाऊन भांडणे सुरू करतो.
2 A fool takes no pleasure in understanding, but only in airing his own opinions. मूर्ख समंजसपणामध्ये संतोष मानत नाहीत; परंतु स्वतःची मते प्रकट करण्यात आनंद करतात.
3 When wickedness comes, contempt comes too, and with dishonor comes reproach. जेव्हा दुष्टता येते तिथे तिरस्कार येतो, आणि निर्ल्लजपणाबरोबर निंदा येते.
4 The words of a person's mouth are deep waters; the fountain of wisdom is a flowing stream. तोंडातील शब्द खोल पाण्यासारखे आहेत; परंतु सुज्ञतेचा झरा म्हणजे पाण्याचा उफळता प्रवाह आहे.
5 It is not good to show partiality to the wicked, denying justice to the righteous. न्यायाधीशाने दुष्टावर कृपा करणे आणि निरपराध्याला न्यायापासून वंचित करणे चुकीचे आहे.
6 A fool's lips bring strife, and his mouth invites a beating. मूर्खांच्या जिभा त्यांना कलहात पाडतात; आणि त्यांचे मुख माराला आमंत्रण देते.
7 A fool's mouth is his ruin, and his lips are a snare to his soul. मूर्खाचे मुख त्यांच्या विनाशाचे कारण होते, आणि त्यांच्या जिभेमुळे त्यांचे जीव सापळ्यात अडकतात.
8 The words of a gossip are like choice morsels; they go down into the inmost being. अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात.
9 Whoever is slack in his work is brother to one who destroys. जो त्याचे काम करण्यात आळशी आहे, तो विध्वंस करणार्‍याचा भाऊ आहे.
10 The name of our Father is a strong tower; the righteous runs into it and is safe. याहवेहचे नाव बळकट दुर्ग आहे; नीतिमान तिकडे धाव घेतात आणि सुरक्षित राहतात.
11 A rich man's wealth is his fortified city; in his imagination it is like a high wall. धनवानाचे धन त्यांचे तटबंदीचे नगर आहे; ते कल्पना करतात की त्या उंच भिंती चढण्यास दुष्कर आहेत.
12 Before destruction the human heart is proud, but humility comes before honor. मनुष्याचा नाश होण्याआधी त्याचे हृदय गर्वाने भरते, परंतु सन्मान मिळण्याआधी मनुष्यास नम्रता येते.
13 If one answers before he listens, it is his foolishness and his shame. ऐकून घेण्याआधीच उत्तर देणे— ते मूर्खपणाचे आणि लाजिरवाणे आहे.
14 A person's spirit can sustain him through sickness, but a crushed spirit—who can bear it? मनुष्याचा आत्मा त्याला आजारी अवस्थेतही स्थिर ठेवतो, पण तुटलेले हृदय कोण सहन करू शकतो?
15 The discerning heart acquires knowledge, and the ear of the wise seeks it out. विवेकशील मनुष्याचे अंतःकरण ज्ञान आत्मसात करते. सुज्ञाचे कान ज्ञानाचा शोध घेतात.
16 A person's gift opens the way for him and brings him before important people. उपहार तो देणार्‍याचा मार्ग मोकळा करते, तो तुम्हाला थोर लोकांच्या पुढे घेऊन जाईल!
17 The first to state his case seems right, until another comes and examines him. दुसरा कोणीतरी पुढे येऊन पक्ष मांडत नाही, तोपर्यंत न्यायालयात प्रथम बोलणार्‍याची बाजू योग्य वाटते.
18 Casting the lot settles disputes and separates strong opponents. नाणेफेक करून भांडण मिटवता येते, आणि प्रबळ प्रतिस्पर्ध्यांला दूर ठेवता येते.
19 An offended brother is harder to win than a fortified city, and disputes are like the bars of a fortress. चुकीची वागणूक मिळालेल्या भावाची समजूत घालण्यापेक्षा तटबंदीचे शहर जिंकणे सोपे आहे. वादविवाद राजवाड्यातील बंद द्वारासारखे आहे.
20 From the fruit of a person's mouth his stomach is satisfied; with the yield of his lips he is filled. त्यांच्या मुखफळाने मनुष्याचे पोट भरले जाते; त्यांच्या ओठांनी केलेल्या उत्पन्नामुळे त्यांचे समाधान होते.
21 Death and life are in the power of the tongue, and those who love it will eat its fruit. जिभेत जीवन आणि मृत्यूचे सामर्थ्य आहे. आणि जे तिच्यावर प्रेम करतात त्यांना तिचे प्रतिफळ मिळते.
22 He who finds a wife finds what is good and receives favor from our Father. ज्याला पत्नी लाभते, त्याला चांगुलपणा प्राप्त झाला आहे. ती त्याच्यासाठी याहवेहकडून आनंददायी भेट आहे.
23 The poor person pleads for mercy, but the rich answers harshly. गरीब दयेसाठी विनवण्या करतो आणि श्रीमंत त्याला क्रूरतेने उत्तर देतो.
24 A man of many companions may come to ruin, but there is a friend who sticks closer than a brother. ज्यांचे मित्र अविश्वासू असतात, त्यांचा नाश लवकर होतो, पण एक असा मित्र आहे की जो भावापेक्षाही एकनिष्ठ राहतो.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]