Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 17 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Better a dry crust eaten in peace than a house full of feasting with strife. कलहाच्या वातावरणात मेजवानी खाण्यापेक्षा शांती व समाधानाने भाकरीचा कोरडा तुकडा खाणे बरे.
2 A prudent servant will rule over a disgraceful son and will share the inheritance among the brothers. सुज्ञ गुलाम आपल्या धन्याच्या लज्जास्पद मुलावर सत्ता गाजवील, आणि कुटुंब सभासदाप्रमाणे मालमत्तेत वाटा मिळवील.
3 The crucible is for silver and the furnace for gold, but our Father tests hearts. चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, परंतु अंतःकरणाची पारख याहवेहच करतात.
4 An evildoer listens to wicked lips; a liar listens to a destructive tongue. दुष्ट व्यक्ती फसवणूक करणार्‍याचे भाषण ऐकतो; लबाड बोलणारा मनुष्य विनाशकारी जिभेचे लक्ष देऊन ऐकतो.
5 Whoever mocks the poor insults his Maker; whoever gloats over disaster will not go unpunished. जो गरिबांची चेष्टा करतो, तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अनादर करतो; जो दुसर्‍यांवर आलेल्या संकटामध्ये आनंद करतो, त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
6 Grandchildren are the crown of the aged, and the glory of children is their parents. वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत; आणि मुलांचे भूषण त्यांचे मातापिता आहेत.
7 Fine speech is not fitting for a fool—still less are lying lips for a noble. वक्तृत्वपूर्ण भाषण देवहीन मूर्खाला शोभत नाही— राजाने खोटे बोलणे कितीतरी अशोभनीय आहे!
8 A bribe seems like a magic charm to the one who gives it; wherever he turns, he thinks he will succeed. लाच देणार्‍या माणसासाठी ती जादूच्या रत्नासारखी आहे; त्यांना वाटते की त्याने त्यांची कामे यशस्वी होतील.
9 Whoever covers an offense seeks love, but whoever keeps bringing it up separates close friends. जो कोणी प्रीतीची भावना जोपासतो तो अपराध झाकून देतो; परंतु जो कोणी ती अप्रिय गोष्ट पुन्हापुन्हा बोलतो त्याचे जवळचे मित्र दूरावतात.
10 A rebuke goes deeper into a person of understanding than one hundred blows into a fool. मूर्खाला मारलेल्या शंभर फटक्यांपेक्षा विवेकी मनुष्याला रागावून बोललेला एक शब्द अधिक प्रभावी असतो.
11 A rebellious man seeks only evil, and a cruel messenger will be sent against him. वाईट कृत्ये करणारे परमेश्वराविरुद्ध बंडखोरी वाढवितात; मृत्यूचा दूत त्यांच्याकडे पाठविण्यात येईल.
12 Better to meet a bear robbed of her cubs than a fool in his foolishness. जिची पिल्ले पळवून नेली आहेत त्या अस्वलीची तिची भेट झालेली चालेल, परंतु मूर्खपणाचा अट्टाहास करणाऱ्या मूर्खाची भेट नको.
13 If anyone returns evil for good, evil will never leave his house. जो चांगल्याची फेड वाईटाने करतो, त्याच्या घराला अरिष्ट कधीही सोडणार नाही.
14 Starting a quarrel is like breaching a dam, so drop the dispute before it bursts out. भांडण सुरू करणे हे धरणाला भगदाड पाडण्यासारखे आहे; म्हणून ते सुरू होण्याआधीच तो विषय संपविणे बरे.
15 Whoever justifies the wicked and whoever condemns the righteous—both alike are detestable to our Father. दोषी व्यक्तीला निर्दोष ठरविणे आणि निर्दोष व्यक्तीला दोषी ठरविणे— अशा दोन्हीचा याहवेह तिरस्कार करतात.
16 Why should a fool have money in hand to buy wisdom, when he has no heart to learn? जर ते समजू शकत नाहीत तर ज्ञानवर्धनासाठी मूर्खाच्या हातात पैसे का असावेत?
17 A friend loves at all times, and a brother is born for a time of trouble. खरा मित्र नेहमीच प्रेम करतो; आणि संकटसमयासाठीच भावाचा जन्म झालेला असतो.
18 One who lacks sense shakes hands on a pledge and puts up security for his neighbor. जो हस्तांदोलन करून शपथ घेऊन शेजार्‍याच्या कर्जफेडीची हमी घेतो, तो विवेकहीन मनुष्य आहे.
19 Whoever loves wrongdoing loves strife; whoever builds his gate high invites destruction. जो कोणी कलहप्रिय असतो तो पापाची आवड धरतो; जो कोणी उंच प्रवेशद्वार बांधतो तो आपत्तींना आमंत्रण देतो.
20 A crooked heart finds no good, and a twisted tongue falls into trouble. ज्याचे हृदय भ्रष्ट आहे त्याची समृद्धी होत नाही; ज्याची जीभ विकृत भाषण करते, तो संकटात पडतो.
21 Whoever fathers a fool brings grief on himself; the father of a godless fool has no joy. जो मूर्खाला जन्म देतो तो दुःखाला पाचारण करतो, आणि देवहीन मूर्खाच्या पालकांना आनंद मिळत नाही.
22 A joyful heart is good medicine, but a crushed spirit dries up the bones. आनंदी मन औषधाप्रमाणे हितकर असते, पण खिन्न मन हाडे शुष्क करते.
23 A wicked man takes a bribe in secret to pervert the ways of justice. न्यायाचे पारडे फिरविण्यासाठी, दुष्ट मनुष्य गुप्त रीतीने लाच घेतो.
24 A discerning person keeps wisdom in view, but the eyes of a fool wander to the ends of the earth. समंजस मनुष्याची दृष्टी ज्ञानावर केंद्रित असते, पण मूर्खाची नजर पृथ्वीच्या शेवटपर्यंत सैरभैर फिरत असते.
25 A foolish son is a grief to his father and bitterness to the mother who bore him. मूर्ख मुलगा आपल्या वडिलांच्या दुःखास कारणीभूत होतो, आणि ज्या आईने त्याला जन्म दिला तिला क्लेश देतो.
26 To punish the righteous is not good, nor to flog the noble for their integrity. निर्दोषांना दंड देणे योग्य नव्हे, तसेच प्रामाणिक अधिपतींना शिक्षा करणे हे निश्चितच चुकीचे आहे.
27 Whoever holds back his words has knowledge, and one with a calm spirit is a person of understanding. ज्ञानी संयमाने शब्दाचा वापर करतो, आणि समंजस शांत स्वभावाचा असतो.
28 Even a fool who keeps silent is thought wise; when he closes his lips, he seems discerning. जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात, आणि जर त्यांच्या जिभेवर त्यांनी ताबा ठेवला, तर ते विवेकशील मानले जातात.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]