Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 19 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Better is a poor person who walks in his integrity than one whose words are crooked and is a fool. विकृत ओठांच्या मूर्ख मनुष्यापेक्षा, निर्दोषपणाने वागणारा गरीब मनुष्य अधिक चांगला आहे.
2 Also, desire without knowledge is not good, and whoever acts in haste misses the way. योग्य ज्ञान असल्याशिवाय इच्छा धरणे चांगले नाही— घाई करणारे पाय कितीदा असे मार्ग चुकवितात!
3 A person's own foolishness ruins his way, yet his heart rages against our Father. मनुष्य स्वतःच्याच मूर्खपणाने आपल्या नाशाकडे जातो, तरीही त्याचे हृदय याहवेहविरुद्ध संतापते.
4 Wealth adds many friends, but the poor is separated from his friend. संपत्ती पुष्कळ मित्र आकर्षित करते, परंतु अगदी जवळचा मित्रही गरिबाला सोडून जातो.
5 A false witness will not go unpunished, and one who breathes out lies will not escape. खोट्या साक्षीदाराला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. आणि खोटे शब्द ओतणार्‍याची सुटका होणार नाही.
6 Many seek the favor of a generous person, and everyone is a friend to one who gives gifts. शासनकर्त्याची कृपा लाभावी म्हणून अनेकजण त्याचे स्तुतिपाठक बनतात, आणि प्रत्येकजण देणग्या देणाऱ्याचा मित्र असतो.
7 All the brothers of a poor person hate him; how much more do his friends keep far from him! He calls after them, but they are gone. गरीब माणसांचे सर्व नातेवाईक त्याला टाळतात— तर त्याचे मित्र त्याला किती बरे टाळतील! गरीब मनुष्य गयावया करून कितीही त्यांच्यामागे गेला तरी ते कुठेही सापडत नाहीत.
8 Whoever gets wisdom loves his own soul; whoever guards understanding will find good. जो सुज्ञता मिळवितो, तो त्याच्या जीवनावर प्रीती करतो; आणि जो समंजसपणाची आवड धरतो, तो लवकर समृद्ध होतो.
9 A false witness will not go unpunished, and one who breathes out lies will perish. खोट्या साक्षीदाराला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, आणि खोटे शब्द ओतणार्‍याचा नाश होईल.
10 Luxury is not fitting for a fool—much less for a servant to rule over princes. मूर्खाने ऐषारामात राहणे उचित नाही— तसेच गुलामाने राजपुत्रावर अधिकार गाजविणे योग्य नाही!
11 The good sense of a person makes him slow to anger, and it is his glory to overlook an offense. मनुष्याची सुज्ञता त्याला मंदक्रोधी राखते; आणि चुकांकडे दुर्लक्ष करणे त्याची प्रतिष्ठा असते.
12 A king's wrath is like the roaring of a lion, but his favor is like dew on the grass. राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा असतो, परंतु त्याची कृपादृष्टी गवतावरील दवबिंदूसारखी असते.
13 A foolish son is ruin to his father, and a wife's quarreling is a continual dripping. मूर्ख संतान म्हणजे वडिलांच्या नाशाचे कारण आहे. आणि भांडखोर पत्नी ही सतत ठिबकणार्‍या गळक्या छप्परासारखी आहे.
14 House and wealth are an inheritance from one's ancestors, but a prudent wife is from our Father. पूर्वजांपासून वारसांना घरेदारे व संपत्ती मिळते, परंतु समंजस पत्नी याहवेहपासून मिळते.
15 Laziness casts into deep sleep, and an idle person will go hungry. आळस मनुष्याला गाढ झोप आणतो आणि लक्ष्यहीन मनुष्य उपाशी राहतो.
16 Whoever keeps the commandment keeps his life; whoever despises his ways will die. जे याहवेहच्या आज्ञा पाळतात, ते आपला जीव सुरक्षित ठेवतात, परंतु जे आपल्या वर्तनाविषयी निष्काळजी असतात, ते मृत्युमुखी पडतात.
17 Whoever is generous to the poor lends to our Father, and our Father will repay him for his deed. जो गरिबांना मदत करतो, तो याहवेहला उसने देतो, आणि त्यांच्या सत्कृत्याबद्दल याहवेह परतफेड करतील.
18 Discipline your son while there is hope, and do not set your heart on his destruction. तुझ्या मुलांना शिस्त वेळेवर लाव, कारण त्यातच आशा आहे; परंतु शिस्त मर्यादे पलीकडे जाऊ नये, जेणेकरून त्यात त्याला मृत्युच येईल.
19 A person of great wrath must pay the penalty; for if you rescue him, you will only have to do it again. तापट मनुष्याला त्याच्या कृतीची शिक्षा भोगावीच लागते; त्यांना सोडविलेस, तर तुम्हाला पुन्हा तेच करावे लागेल.
20 Listen to counsel and accept discipline, that you may gain wisdom in the days to come. बोध ऐका आणि शिक्षण स्वीकारा आणि शेवटी तुमची गणना सुज्ञ्यांमध्ये होईल.
21 Many are the plans in a person's heart, but it is the counsel of our Father that will stand. मनुष्य आपल्या मनात अनेक योजना आखतो, पण याहवेहची योजनाच यशस्वी होते.
22 What is desired in a person is covenant love, and a poor person is better than a liar. मनुष्य इच्छा बाळगतो की त्याला अतूट प्रेम मिळावे; लबाडी करण्यापेक्षा गरीब राहणे बरे.
23 The fear of our Father leads to life, and whoever has it rests satisfied, untouched by harm. याहवेहच्या भयाने जीवनप्राप्ती होते; तेव्हा अरिष्टाचा स्पर्शही न होता, एखादा समाधानाने विश्रांती घेतो.
24 The sluggard buries his hand in the dish and will not even bring it back to his mouth. आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो; तो हात पुन्हा तोंडापर्यंत आणत नाही!
25 Strike a mocker, and the simple will learn prudence; reprove a person of understanding, and he will gain knowledge. निंदकाला चाबकाचा मार द्या, म्हणजे साधाभोळा धडा शिकेल; सुज्ञांना फटकारणी करा, म्हणजे ते अधिक सुज्ञ होतील.
26 Whoever does violence to his father and drives away his mother is a son who brings shame and disgrace. जे कोणी त्यांच्या वडिलांना लुटतात आणि त्यांच्या आईला हाकलून देतात, ती अशी संतान आहे जी लज्जा व अप्रतिष्ठा यांना कारणीभूत होते.
27 Stop listening to instruction, my son, and you will stray from the words of knowledge. माझ्या मुला, जर शिक्षण ऐकण्याचे थांबवलेस, तर ज्ञानाच्या वचनापासून तू दूर जाशील.
28 A worthless witness mocks at justice, and the mouth of the wicked gulps down wickedness. भ्रष्ट साक्षीदार न्यायाची अवहेलना करतात; दुष्टांचे मुख दुष्टता गिळून टाकतात.
29 Punishment is prepared for mockers, and beatings for the backs of fools. निंदकांसाठी शिक्षा आणि मूर्खांची पाठ फटक्यांसाठी निर्धारित केली आहे.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]