Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 20 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Wine is a mocker, strong drink a brawler, and whoever staggers under it is not wise. मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते; तिच्यामुळे जे पथभ्रष्ट होतात ते शहाणे नाहीत.
2 The terror of a king is like the growl of a lion; whoever provokes him to anger forfeits his own life. राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा भयप्रद आहे; जो त्याचा राग जागृत करतो त्याची प्राणहानी होते.
3 It is an honor for a person to keep clear of strife, but every fool is quick to quarrel. कलहापासून दूर राहणे मनुष्याचा सन्मान आहे, परंतु प्रत्येक मूर्ख भांडणास तत्पर असतो.
4 A lazy person will not plow in autumn; so at harvest he looks for a crop and finds nothing. आळशी निर्धारित ऋतूमध्ये नांगरणी करीत नाहीत; म्हणून हंगामाच्या वेळी शोधून त्यांना काहीही मिळणार नाही.
5 The purposes of a person's heart are deep waters, but one who has understanding draws them out. मनुष्याच्या अंतःकरणाचे उद्देश हे खोल पाण्यासारखे आहेत, परंतु ज्याच्याकडे अंतर्दृष्टी असते तो त्या उद्देशांना ओढून बाहेर काढतो.
6 Many a person proclaims his own loyal love, but a faithful one—who can find? पुष्कळजण अतूट प्रेम असल्याचा दावा करतात, परंतु प्रामाणिक मनुष्य कोणाला सापडेल?
7 The righteous walk in their integrity; blessed are their children after them! नीतिमान मनुष्य निष्कलंकीतपणे चालतो; त्याच्यामागे त्याच्या मुलाबाळांना आशीर्वाद प्राप्त होतात.
8 A king seated on the throne of judgment winnows out all evil with his eyes. जेव्हा राजा न्याय करण्यासाठी सिंहासनावर बसतो तेव्हा तो त्याच्या नजरेने सर्व वाईट पाखडून दूर करतो.
9 Who can say, "I have kept my heart pure; I am cleansed from my sin"? “मी माझे अंतःकरण शुद्ध ठेवले आहे, मी शुद्ध आहे आणि पाप केलेले नाही.” असे कोण म्हणू शकेल?
10 Unequal weights and unequal measures—our Father detests them both. वजनावजनांत व मापामापांत फरक असणे— या दोन गोष्टींचा याहवेहला वीट आहे.
11 Even a child is known by his actions, by whether his conduct is pure and upright. अगदी लहान मुलेसुद्धा खरोखरच प्रामाणिक आणि निर्दोष आहेत ते त्यांच्या कृत्यांवरून ओळखली जात नाहीत काय?
12 The hearing ear and the seeing eye—our Father made them both. पाहणारे डोळे व ऐकणारे कान— दोन्हीही याहवेहचीच निर्मिती आहे.
13 Do not love sleep, or you will grow poor; open your eyes, and you will have plenty of bread. तू झोपेची आवड धरू नकोस, नाहीतर तू गरीब होत जाशील; जागा राहा आणि तुझ्याकडे विपुल खाद्य शिल्लक राहील.
14 "Worthless, worthless!" says the buyer—then off he goes and boasts of his bargain. खरेदी करणारा म्हणतो, “हे चांगले नाही, हे चांगले नाही!” नंतर तो जातो आणि खरेदी बद्दल बढाई मारतो.
15 There is gold and an abundance of jewels, but lips that speak knowledge are a rare treasure. सोने आहे आणि माणकेही भरपूर आहेत, परंतु शहाणपणाचे शब्द बोलणारे ओठ दुर्मिळ रत्न आहे.
16 Take the garment of one who puts up security for a stranger; hold it as a pledge when he does so for foreigners. जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे; जर ते परक्यासाठी केले असेल तर ते गहाण म्हणून घे.
17 Bread gained by deceit tastes sweet, but afterward the mouth is full of gravel. फसवणूक करून मिळविलेले अन्न स्वादिष्ट लागते, परंतु त्याचे मुख शेवटी खड्यांनी भरून जाईल.
18 Plans are established by counsel; so wage war only with wise guidance. सल्ला घेऊन योजना स्थापल्या जातात; म्हणून युद्ध करण्यापूर्वी योग्य मार्गदर्शन मिळव.
19 A gossip betrays a confidence; so do not keep company with a babbler. चहाड्या करणारा विश्वासघात करतो; म्हणून अतिशय बोलणार्‍यापासून दूर राहावे.
20 Whoever curses his father or mother—his lamp will be snuffed out in deepest darkness. जो आपल्या आईवडिलांना शिव्याशाप देतो, त्याचा दीप गडद अंधारात विझून जाईल.
21 An inheritance gained too quickly at the start will not be blessed in the end. वारसासंपत्तीसाठी उतावळेपणे समयापूर्व केलेला दावा शेवटपर्यंत आशीर्वादित राहत नाही.
22 Do not say, "I will pay back evil for evil." Wait for our Father, and he will deliver you. “वाईटाची फेड मी नक्की करेन!” असे म्हणू नकोस. याहवेहची प्रतीक्षा कर, ते तुझ्यासाठी प्रतिशोध घेतील.
23 Our Father detests unequal weights, and dishonest scales are no good. वजनात व मापात फरक असणे याचा याहवेहला वीट आहे आणि अप्रामाणिक वजनकाटे त्यांना प्रसन्न करीत नाहीत.
24 A person's steps are directed by our Father; how then can anyone understand his own way? याहवेह मनुष्याचे मार्ग निर्धारित करतात. तर मग स्वतःचे मार्ग कोण समजू शकेल?
25 It is a trap to rashly dedicate something and only later reconsider the vow. विचार न करता घाईघाईने समर्पण करणे आणि नंतर दिलेल्या शपथांचा विचार करणे, मनुष्यासाठी हा एक सापळा आहे.
26 A wise king winnows out the wicked and drives the threshing wheel over them. सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून बाहेर काढतो; तो मळणीचे चक्र त्यांच्यावर फिरवितो.
27 The human spirit is the lamp of our Father, searching every inmost part. मनुष्याचा आत्मा याहवेहचा दीप आहे. तो मनुष्याच्या अंतःकरणावर प्रकाश टाकतो.
28 Loyal love and faithfulness preserve a king; by loyal love his throne is upheld. प्रीती आणि विश्वासूपणा राजाला सुरक्षित ठेवते; तर प्रीतीद्वारे त्याचे सिंहासन सुरक्षित केले जाते.
29 The glory of the young is their strength, but the splendor of the old is gray hair. तरुणांचे भूषण त्यांचे बळ आहे. वृद्धांचे भूषण त्यांचे पांढरे केस आहेत.
30 Wounding blows scrub away evil, and beatings cleanse the inmost parts. बसलेला मार आणि जखमा दुष्टता धुवून टाकते, आणि बसलेल्या फटक्यांनी अंतःकरण शुद्ध होते.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]