Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 21 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 The king's heart is a stream of water in our Father's hand; he turns it wherever he pleases. याहवेहच्या नियंत्रणात असलेले राजाचे हृदय पाण्याचा प्रवाह आहे, जे त्यांना संतोष देतात त्यांच्याकडे ते वळवितात.
2 Every way of a person seems right in their own eyes, but our Father weighs the heart. माणसांना वाटते की त्यांचेच मार्ग योग्य आहेत, परंतु याहवेह अंतःकरण तोलून पाहतात.
3 To do what is right and just is more pleasing to our Father than sacrifice. अर्पणापेक्षा मनुष्याच्या न्याय्य व रास्त वागण्याने याहवेहला अधिक संतोष होतो.
4 Haughty eyes and a proud heart—the lamp of the wicked—are sin. गर्विष्ठ दृष्टी आणि अभिमानी अंतःकरण— दुष्टांचे नांगर न चालविलेले शेत—पाप उत्पन्न करतात.
5 The plans of the diligent lead surely to abundance, but all who are hasty end up in poverty. कष्ट करणार्‍यांच्या योजना भरभराटीस येतात, पण उतावळेपणा दारिद्र्यास कारणीभूत होईल.
6 Making a fortune by a lying tongue is a fleeting vapor, a deadly trap. लबाड बोलून मिळवलेली संपत्ती, म्हणजे उडून जाणारी वाफ आणि प्राणघातक सापळा आहे.
7 The violence of the wicked will drag them away, because they refuse to do what is just. दुष्टांचा हिंसाचार त्यांना ओढून घेऊन जाईल, कारण चांगले करण्यास ते नकार देतात.
8 The way of the guilty is crooked, but the conduct of the pure is upright. दोषी मनुष्याचा मार्ग फसविणारा आहे, परंतु निर्दोष मनुष्याचे वागणे सरळपणाचे असते.
9 Better to live in a corner of the roof than in a shared house with a quarrelsome wife. भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्‍यात राहणे बरे.
10 The soul of the wicked craves evil; their neighbor finds no mercy in their eyes. दुष्ट माणसे वाईटाची इच्छा धरतात; आणि त्यांच्या शेजार्‍यांवर ते कधीही दया करीत नाहीत.
11 When a mocker is punished, the simple grow wise; when the wise are instructed, they gain knowledge. जेव्हा टवाळखोरांना शिक्षा होते, ते बघून साधाभोळा मनुष्य शहाणा होतो; शहाण्या माणसांचे ऐकून ते ज्ञान मिळवितात.
12 Our Father, the Righteous One, observes the house of the wicked and brings the wicked to ruin. नीतिमान व्यक्ती दुष्टाच्या घरावर लक्ष ठेवतात आणि त्या दुष्टाची दुष्टता त्याचा नाश करतात.
13 Whoever shuts their ears to the cry of the poor will also cry out and not be answered. जे कोणी गरिबांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतात, ते जेव्हा आक्रोश करतील तेव्हा त्यांना उत्तर मिळणार नाही.
14 A gift given in secret soothes anger, and a bribe slipped into the cloak calms strong wrath. गुप्तपणे दिलेले बक्षीस राग शांत करते; झग्यात लपवून दिलेला उपहार तीव्र क्रोध शांत करते.
15 When justice is done, it is a joy to the righteous but terror to those who do evil. जेव्हा न्याय मिळतो तेव्हा नीतिमान आनंद करतो. पण दुष्ट कृत्ये करणार्‍यांना ते प्राणसंकटच वाटते.
16 A person who strays from the way of understanding will rest in the assembly of the dead. शहाणपणाचा मार्ग सोडून दूर जाणारा मनुष्य मृतांच्या मंडळीत विश्रांतीसाठी येतो.
17 Whoever loves pleasure will become poor; whoever loves wine and oil will never grow rich. भोग विलासाची आवड असणारा गरीब होतो; मद्यपान व सुगंधी तेलाची आवड धरणारा कधीही श्रीमंत होत नाही.
18 The wicked become a ransom for the righteous, and the treacherous for the upright. दुष्ट नीतिमानांसाठी, आणि विश्वासघातकी सरळ लोकांसाठी खंडणी असतो.
19 Better to live in a desert land than with a quarrelsome and complaining wife. भांडकुदळ व सतत टोचून बोलणार्‍या पत्नीबरोबर राहण्यापेक्षा वाळवंटात राहिलेले बरे!
20 Precious treasure and oil are in the home of the wise, but a fool devours all he has. शहाणा मनुष्य उत्कृष्ट भोजन आणि जैतून तेलाचा साठा करतो, पण मूर्ख मिळेल ते सर्व गिळून टाकतो.
21 Whoever pursues righteousness and faithful love will find life, righteousness, and honor. जो कोणी नीतिमत्व आणि प्रीती मिळविण्याचा प्रयत्न करतो, त्याला जीवन, समृद्धी व सन्मान यांचा लाभ होतो.
22 A wise person scales the city of the mighty and brings down the stronghold they trust in. सुज्ञ मनुष्य बलवानाच्या शहराविरुद्ध जाऊ शकतो आणि ज्या किल्ल्यावर ते भरवसा ठेवतात ते तो उद्ध्वस्त करतो.
23 Whoever guards their mouth and tongue keeps themselves out of trouble. जे कोणी त्यांच्या तोंडावर आणि त्यांच्या जिभेवर नियंत्रण ठेवतात, ते संकटापासून दूर राहतात.
24 "Mocker" is the name of the proud and arrogant who acts with outrageous insolence. गर्विष्ठ, उद्धट ज्याचे नाव “टवाळखोर” आहे, तो तीव्र संतापाने वागतो.
25 The craving of a lazy person kills him, for his hands refuse to work. आळशी मनुष्याची आशा त्याच्यासाठी मृत्यू ठरेल, कारण त्याचे हात काम करण्यास नकार देतात.
26 All day long the craving grows, but the righteous give and do not hold back. अधिक मिळावे यासाठी तो दिवसभर तीव्र इच्छा करतो, परंतु नीतिमान राखून न ठेवता दान देतात.
27 The sacrifice of the wicked is detestable—how much more when brought with evil intent. दुष्टांच्या यज्ञार्पणांचा याहवेहला वीट आहे— तर मग जेव्हा वाईट हेतूने अर्पण आणले जाते ते किती तिरस्करणीय असेल!
28 A false witness will perish, but whoever listens will testify with lasting effect. खोटा साक्षीदार नाश पावेल, परंतु काळजीपूर्वक ऐकणारा यशस्वी रीतीने साक्ष देईल.
29 The wicked put on a bold face, but the upright give thought to their ways. दुष्ट निर्भयतेचा आव आणतो, पण सरळ मनुष्य मात्र विचारपूर्वक मार्ग निवडतो.
30 There is no wisdom, no understanding, no counsel that can stand against our Father. मनुष्याचे कोणतेही सुज्ञान, बुद्धिमत्ता, कोणत्याही योजना याहवेहविरुद्ध यशस्वी होऊ शकत नाहीत.
31 The horse is made ready for the day of battle, but victory belongs to our Father. लढाईसाठी घोड्याला तयार केले आहे, परंतु विजय देणे याहवेहच्याच हाती असते.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]