Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 22 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 A good name is to be chosen rather than great riches, and favor is better than silver or gold. चांगले नाव मिळविणे पुष्कळ संपत्ती मिळविण्यापेक्षा व बहुमान मिळविणे सोन्याचांदीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.
2 The rich and the poor meet together; our Father is the Maker of them all. श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये हे साम्य आहे; त्या दोघांनाही याहवेहनेच घडविले आहे.
3 The prudent sees danger and takes cover, but the simple keep going and pay the price. सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो.
4 The reward for humility and the fear of our Father is riches and honor and life. याहवेहचे भय ही नम्रता आहे; त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे.
5 Thorns and snares lie in the path of the crooked; whoever guards his soul stays far from them. दुष्टाच्या मार्गात काटे व पाश असतात; परंतु जे त्यांच्या जिवास जपतात, ते अशा मार्गांपासून दूर राहतात.
6 Train up a child in the way he should go, and even when he is old he will not depart from it. लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा, म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत.
7 The rich rules over the poor, and the borrower is slave to the lender. जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो, तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो.
8 Whoever sows injustice will reap calamity, and the rod of his fury will fail. जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल, आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल.
9 Whoever has a generous eye will be blessed, for he shares his bread with the poor. उदारपणे वागणारी माणसे स्वतःच आशीर्वादित होतात, कारण ते त्यांच्या अन्नात गरिबांना वाटेकरी करतात.
10 Drive out the scoffer, and strife goes with him; quarreling and abuse will cease. टवाळखोराला हाकलून द्या, कलह आपोआप संपेल; भांडण आणि अपमान देखील बंद होतील.
11 Whoever loves a pure heart and speaks graciously will have the king as his friend. जो शुद्ध हृदयावर प्रेम करतो आणि कृपायुक्त भाषण करतो तो राजाचा मित्र होईल.
12 The eyes of our Father keep watch over knowledge, but he overturns the words of the traitor. याहवेहचे नेत्र ज्ञानाचे रक्षण करतात, परंतु विश्वासघातकी मनुष्याचे शब्द ते निरर्थक करतात.
13 The lazy person says, "There is a lion outside! I will be killed in the streets!" आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे! तो मला भर चौकात ठार करेल!”
14 The mouth of forbidden women is a deep pit; whoever draws our Father's anger will fall into it. वेश्येचे मुख खोल खड्डा आहे; ज्यांच्यावर याहवेहचा क्रोध आहे तेच त्या खड्ड्यात पडतात.
15 Foolishness is bound up in the heart of a child, but the rod of discipline drives it far away. बालकाचे मन मूर्खपणाने भरलेले असते, परंतु अनुशासनाच्या छडीने त्याचा मूर्खपणा दूर करता येईल.
16 Whoever oppresses the poor to enrich himself, or gives to the rich, will come only to poverty. श्रीमंत होण्यासाठी जो गरिबांवर जुलूम करतो तो आणि जो श्रीमंतांना बक्षिसे देतो—दोघेही दरिद्री होतील.
17 Listen carefully to the words of the wise, and apply your heart to my knowledge, लक्ष दे आणि सुज्ञानाचा बोलण्याकडे तुझे कान वळव; मी जे शिक्षण देतो त्याचे तुझ्या हृदयापासून पालन कर,
18 for it will be pleasant if you keep them within you, if all of them are ready on your lips. जेव्हा तू ते आपल्या हृदयात ठेवशील आणि ते सर्व तुला मुखाग्र असतील तर तुला आनंद मिळेल.
19 So that your trust may be in our Father, I have made them known to you today, even to you. म्हणजे तुझा याहवेहवर विश्वास राहील, मी आज तुला शिकवितो, होय तुलासुद्धा.
20 Have I not written for you thirty sayings of counsel and knowledge, सल्लामसलत आणि ज्ञान याविषयी मी तीस वचने तुमच्यासाठी लिहिली नव्हती काय?
21 to teach you what is right and true, so that you may give a true answer to those who sent you? प्रामाणिक असणे आणि सत्य बोलणे तुला शिकविले नाही काय म्हणजे ज्यांच्याकडे तू काम करतोस त्यांच्यासाठी खरा अहवाल आणू शकशील?
22 Do not rob the poor because he is poor, or crush the afflicted at the gate, गरिबांना ते गरीब आहेत म्हणून लुबाडू नका, आणि गरजवंतांना न्यायालयात चिरडू नका,
23 for our Father will plead their cause and will rob of life those who rob them. कारण याहवेह त्यांचा खटला लढतील आणि जीवनासाठी जीवन घेतील.
24 Do not befriend a man given to anger, and do not go with a hot-tempered man, तापट माणसांची मैत्री करू नका, जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका,
25 or you will learn his ways and entangle yourself in a snare. नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल, आणि तुम्ही स्वतःच आपला जीव पाशात घालाल.
26 Do not be one of those who give pledges, who put up security for debts. वचन देऊन हात मिळवणी करणार्‍यासारखे तुम्ही होऊ नका किंवा कर्जाचे जामीन होऊ नका;
27 If you have nothing to pay with, why should your bed be taken from under you? जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील.
28 Do not move the ancient boundary stone that your fathers set up. ज्या तुमच्या पूर्वजांनी निश्चित केल्या आहेत त्या पुरातन सीमारेषांच्या खुणा बदलू नका.
29 Do you see a man skillful in his work? He will stand before kings; he will not stand before ordinary men. आपल्या कामात निपुण असणारी माणसे तू पाहिली आहे का? ते खालच्या श्रेणीच्या अधिकार्‍यांसमोर नाही तर राजांसमोर सेवा करतील.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]