Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 13 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 A wise son heeds his father's instruction, but a scoffer does not listen to rebuke. सुज्ञ पुत्र आपल्या पित्याच्या शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, परंतु उपहास करणारा पुत्र फटकारास प्रतिसाद देत नाही.
2 From the fruit of his mouth a person enjoys good things, but the appetite of the treacherous is for violence. मनुष्याला आपल्या मुखफळांनी उत्तम वस्तू प्राप्त होतील, परंतु कपटी माणसांना हिंसाचाराची भूक लागते.
3 Whoever guards his mouth protects his life, but one who opens his lips wide comes to ruin. जो आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो, तो स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवतो, परंतु जो विचार न करता बोलतो, त्याचा नाश होतो.
4 The lazy person craves and gets nothing, but the appetite of the diligent is richly satisfied. आळशी मनुष्याची भूक कधीही मिटत नाही, परंतु परिश्रमी मनुष्याच्या इच्छांचे पूर्णपणे समाधान केले जाते.
5 The righteous hates falsehood, but the wicked brings shame and disgrace. नीतिमान मनुष्य असत्याचा तिरस्कार करतो, परंतु दुष्ट मनुष्य स्वतःस दुर्गंधपूर्ण करतो आणि आपली बेअब्रू करून घेतो.
6 Righteousness guards the one whose way is blameless, but wickedness overthrows the sinner. नीतिमत्ता प्रामाणिक मनुष्याचे रक्षण करते, परंतु दुष्टता पापी मनुष्याचा संपूर्ण विनाश करते.
7 One person pretends to be rich, yet has nothing; another pretends to be poor, yet has great wealth. एखादी व्यक्ती श्रीमंतीचा दिखावा करते, परंतु त्याच्याकडे काहीच नसते; दुसरा एकजण गरीब असल्याचा दिखावा करतो, परंतु त्याच्याकडे खूप संपत्ती असते.
8 A person's wealth may ransom his life, but the poor hears no threat. मनुष्याची श्रीमंती त्याच्या जिवासाठी खंडणी देईल, परंतु गरीब मनुष्य अशा धमकीला प्रतिसाद देऊ शकत नाही.
9 The light of the righteous shines joyfully, but the lamp of the wicked will be snuffed out. नीतिमानाचा प्रकाश तेजाने चकाकतो, परंतु दुष्टांची ज्योत विझवली जाते.
10 Arrogance breeds nothing but strife, but wisdom is with those who seek advice. जिथे भांडण आहे, तिथे गर्व उपस्थित आहे, परंतु जे सल्ला स्वीकारतात त्यांच्यामध्ये सुज्ञता दिसून येते.
11 Wealth gained by fraud dwindles away, but whoever gathers little by little makes it grow. कपटाने मिळविलेला पैसा झिजून नाहीसा होतो, पण जो हळूहळू कष्ट करून पैसे जमा करतो, तो त्यात वाढ करतो.
12 Hope deferred makes the heart sick, but desire fulfilled is a tree of life. आशेची प्राप्ती लांबणीवर पडल्याने हृदय खिन्न होते, परंतु पूर्ण झालेली इच्छा, जीवनाचा वृक्ष ठरते.
13 Whoever despises the word brings ruin on himself, but the one who reveres the commandment will be rewarded. जो शिक्षण तुच्छ लेखतो, तो त्याचा परिणाम भोगेल, पण जो आज्ञेचा मान राखतो, त्याला चांगले प्रतिफळ मिळेल.
14 The teaching of the wise is a fountain of life, turning a person away from the snares of death. सुज्ञ मनुष्याचा सल्ला जीवनाचा झरा आहे. तो मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवितो.
15 Good sense wins favor, but the way of the treacherous is their undoing. उत्तम बोधामुळे अनुकूलता मिळते, परंतु विश्वासहीनांचे मार्ग त्यांना नाशाकडे नेतात.
16 Every prudent person acts with knowledge, but a fool flaunts his foolishness. जे सर्व समंजस असतात ते सुज्ञतेने वागतात, परंतु मूर्ख माणसे त्यांचा मूर्खपणा उघड करतात.
17 A wicked messenger falls into trouble, but a faithful envoy brings healing. दुष्ट निरोप्या संकटात पडतो, परंतु विश्वासू राजदूत आरोग्य आणतो.
18 Poverty and shame come to whoever ignores discipline, but the one who heeds correction is honored. जो शिक्षण नाकारतो, त्याला दारिद्र्य आणि लज्जा प्राप्त होतात, पण जो अनुशासन स्वीकारतो, त्याला सन्मान लाभेल.
19 A desire fulfilled is sweet to the soul, but turning away from evil is detestable to fools. अभिलाषेची तृप्ती जीवाला मधुरता प्रदान करते, परंतु मूर्ख वाईटापासून वळण्याचा तिरस्कार करतात.
20 Whoever walks with the wise grows wise, but the companion of fools suffers harm. सुज्ञ मनुष्याबरोबर मैत्री कर आणि सुज्ञ हो, कारण मूर्खांच्या सोबतीने नुकसान सहन करावे लागते.
21 Disaster pursues sinners, but good rewards the righteous. अरिष्ट पातक्यांच्या पाठीस लागते, परंतु नीतिमानांना कल्याण हे प्रतिफळ मिळेल.
22 A good person leaves an inheritance to his grandchildren, but the sinner's wealth is stored up for the righteous. चांगला मनुष्य त्यांच्या नातवंडांसाठी वतन ठेवून जातो, परंतु पापी मनुष्याने साठविलेले धन नीतिमानांसाठी असते.
23 The unplowed field of the poor could yield abundant food, but it is swept away for lack of justice. विना नांगरलेल्या शेतातही गरिबांसाठी धान्य उत्पन्न होते; परंतु अन्याय ते हिरावून नेते.
24 Whoever withholds the rod hates his son, but the one who loves him is diligent to discipline him. जे कोणी छडी आवरतात, ते त्यांच्या लेकरांचा द्वेष करतात, परंतु जे त्यांच्या लेकरांवर प्रेम करतात, ते त्यांना काळजीपूर्वक शिस्त लावतात.
25 The righteous eats to his heart's content, but the belly of the wicked goes hungry. नीतिमान मनुष्य जिवाचे समाधान होईपर्यंत खातो, परंतु दुर्जनाचे पोट रिकामेच राहते.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]