Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 14 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 The wisest of women builds her house, but foolishness tears hers down with her own hands. सुज्ञ स्त्री तिचे घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री स्वतःच्याच हातांनी ते जमीनदोस्त करते.
2 Whoever walks in uprightness fears our Father, but one whose ways are crooked despises him. जो कोणी याहवेहचे भय बाळगतो तो प्रामाणिकपणाने वागतो, परंतु जे त्यांचा तिरस्कार करतात त्यांचा मार्ग कपटी असतो.
3 A fool's mouth is a rod for his own pride, but the lips of the wise protect them. मूर्खाचे तोंड गर्विष्ठपणाने शब्दांचा मारा करते, पण सुज्ञ मनुष्यांचे ओठ त्यांचे रक्षण करतात.
4 Where there are no oxen, the manger stays clean, but an abundant harvest comes through the strength of an ox. जिथे कुठे बैल नाहीत तेथील गोठा रिकामा राहतो, परंतु बैलाच्या शक्तीने विपुल धान्याचा उपज होतो.
5 A faithful witness does not lie, but a false witness breathes out lies. खरा साक्षीदार कधीच फसवणूक करीत नाही, परंतु खोटा साक्षीदार मुखातून असत्य ओततात.
6 The scoffer seeks wisdom and finds none, but knowledge comes easily to the discerning. टवाळखोर ज्ञान शोधतो आणि ते त्याला मिळत नाही, परंतु ज्ञान विवेकी मनुष्याकडे सहजपणे येते.
7 Stay away from a fool, for you will find no knowledge on his lips. मूर्खापासून दूर राहा; त्यांच्या बोलण्यातून तुला ज्ञान मिळणार नाही.
8 The wisdom of the prudent is to discern their way, but the foolishness of fools is deceit. सुज्ञाची सुज्ञता त्याला योग्य मार्ग दाखविते, पण मूर्खाची मूर्खता धोका आहे.
9 Fools mock the guilt offering, but among the upright there is favor. मूर्खांना पापक्षालन करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु नीतिमान लोकांमध्ये सदिच्छा असतात.
10 The heart knows its own bitterness, and no stranger shares in its joy. प्रत्येक अंतःकरणाला स्वतःचे दुःख माहीत असते; आणि इतर कोणीही त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाही.
11 The house of the wicked will be destroyed, but the tent of the upright will flourish. दुष्टांचे घर नाश केले जाईल, परंतु नीतिमानाचा तंबू समृद्ध होईल.
12 There is a way that seems right to a person, but its end is the way of death. एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो; परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो.
13 Even in laughter the heart may ache, and the end of joy may be grief. हसत असतानाही हृदयात वेदना असू शकते, उल्हासाचा अंत दुःखातही होऊ शकतो.
14 The backslider in heart will be filled with the fruit of his ways, and a good person with the fruit of his. विश्वासहीनांना त्यांच्या मार्गाची फळे पूर्ण भोगावी लागतील, तसेच चांगल्या माणसांना त्यांच्या चांगुलपणाची.
15 The simple believe anything, but the prudent give thought to their steps. साधीभोळी माणसे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवतात. परंतु सुज्ञ विचारपूर्वक पाऊल उचलतो.
16 The wise fear and turn away from evil, but a fool is reckless and overconfident. सुज्ञ मनुष्य याहवेहचे भय बाळगतो आणि वाईटापासून दूर राहतो. परंतु मूर्ख तापट डोक्याचा आहे आणि तरीही त्याला सुरक्षित वाटते.
17 A quick-tempered person acts foolishly, and one who plots evil schemes is hated. तापट मनुष्य मूर्खपणाच्या गोष्टी करतो, आणि दुष्टसंकल्पांची योजना करणाऱ्याचा तिरस्कार केला जाईल.
18 The simple inherit foolishness, but the prudent are crowned with knowledge. साध्याभोळ्याला मूर्खपणाचा वारसा मिळतो, तर सुज्ञाला सुज्ञतेचा मुकुट मिळतो.
19 The evil bow down before the good, and the wicked at the gates of the righteous. दुष्ट माणसे चांगल्या माणसांसमोर, आणि पापी माणसे नीतिमानांच्या द्वारासमोर शरणागती पत्करतील.
20 The poor are shunned even by their neighbors, but the rich have many friends. गरिबांना त्यांचे शेजारीसुद्धा टाळतात, परंतु श्रीमंतांना मात्र खूप मित्र असतात.
21 Whoever despises his neighbor sins, but blessed is the one who is kind to the poor. शेजार्‍यांचा द्वेष करणे पाप आहे; परंतु जे गरजवंतावर दया करतात ते धन्य!
22 Do not those who plot evil go astray? But covenant love and faithfulness belong to those who plan good. वाईट योजना करणारे मार्ग चुकत नाहीत काय? परंतु चांगल्या योजना करणार्‍यांना प्रीती आणि विश्वासूपणा मिळतो.
23 In all hard work there is profit, but mere talk leads only to poverty. सर्व कष्टाच्या कामाने नफा मिळतो, पण व्यर्थ बडबड भिकेला लावते.
24 The crown of the wise is their wealth, but the foolishness of fools yields only foolishness. सुज्ञांची संपत्ती त्यांचा मुकुट असतो, परंतु मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच उत्पन्न करते.
25 A truthful witness saves lives, but one who breathes out lies is treacherous. सत्य सांगणारा साक्षीदार प्राण वाचवितो, परंतु खोटा साक्षीदार विश्वासघातकी आहे.
26 In the fear of our Father is strong confidence, and his children will have a refuge. याहवेहचा आदर मनुष्याचा दृढ गड आहे, आणि त्याच्या मुलाबाळांना सुरक्षित आश्रयस्थान लाभते.
27 The fear of our Father is a fountain of life, turning a person away from the snares of death. याहवेहचे भय म्हणजे जीवनाचा झरा आहे, ते मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवते.
28 A large population is a king's glory, but without people a prince is ruined. वाढती लोकसंख्या राजाचे वैभव आहे; पण लोकच नसले तर अधिपती नष्ट होतो!
29 Whoever is slow to anger has great understanding, but a hot temper exalts foolishness. जो सहनशील आहे, तो मोठा शहाणा आहे; पण उतावळ्या स्वभावाचा मनुष्य मूर्खता प्रकट करतो.
30 A tranquil heart gives life to the body, but envy rots the bones. शांत हृदय शरीर निरोगी ठेवते; परंतु ईर्षा हाडे कुजविते.
31 Whoever oppresses the poor reproaches our Father, their Maker, but whoever is kind to the needy honors him. गरिबांवर जुलूम करणारा आपल्या उत्पन्नकर्त्याचा अपमान करतो; पण ज्यांना गरजवंताची दया येते, ते परमेश्वराचा सन्मान करतात.
32 The wicked are brought down by their own evil, but the righteous find refuge even in death. नीतिमान माणसे मृत्युक्षणीही परमेश्वरात आश्रयस्थान शोधतात. पण जेव्हा संकट येते तेव्हा दुर्जन चिरडले जातात.
33 Wisdom rests in the heart of the discerning, but even among fools it makes itself known. सुज्ञता विवेकी माणसाच्या हृदयास विश्रांती आणते; पण मूर्खासही ती स्वतःची ओळख करून देते.
34 Righteousness exalts a nation, but sin is a disgrace to any people. नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते. पण पाप कोणत्याही लोकास निंदनीय ठरविते.
35 A king's favor rests on a wise servant, but his wrath falls on one who acts shamefully. सुज्ञ सेवक राजाला प्रसन्न करतो, परंतु निर्लज्ज सेवक राजास क्रोधिष्ट करतो.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]