Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 15 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 A gentle answer turns away wrath, but a harsh word stirs up anger. कोमल उत्तराने राग शांत होतो, परंतु कठोर शब्द क्रोध वाढवितात.
2 The tongue of the wise commends knowledge, but the mouths of fools pour out foolishness. सुज्ञाची जिव्हा ज्ञानाने सुशोभित असते, परंतु मूर्खाचे तोंड मूर्खपणाच ओकते.
3 The eyes of our Father are in every place, keeping watch on the evil and the good. याहवेहचे नेत्र सर्वठिकाणी बघत आहेत, सज्जनांवर व दुर्जनांवर त्यांची नजर असते.
4 A gentle tongue is a tree of life, but a corrupt tongue crushes the spirit. सांत्वन करणारी जीभ जीवनदायी वृक्ष आहे, पण विकृत जीभ आत्म्याला चिरडते.
5 A fool despises his father's instruction, but whoever heeds correction is prudent. मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो, पण जो सुधारणा अंमलात आणतो, तो सुज्ञपणा दाखवितो.
6 In the house of the righteous there is much treasure, but the income of the wicked brings trouble. नीतिमानाच्या घरात विपुल समृद्धी असते, परंतु दुष्टांची मिळकत विनाश आणते.
7 The lips of the wise spread knowledge, but not so the hearts of fools. सुज्ञ व्यक्तीचे मुख ज्ञान पसरवितात, पण मूर्खांचे ह्रदय सरळ नसते.
8 The sacrifice of the wicked is detestable to our Father, but the prayer of the upright is his delight. याहवेहना दुष्टांच्या अर्पणाचा वीट आहे, पण सात्विक लोकांची प्रार्थना त्यांना आनंद देते.
9 The way of the wicked is detestable to our Father, but he loves the one who pursues righteousness. दुष्टांच्या मार्गाचा याहवेह तिरस्कार करतात, पण जे नीतिमत्तेचा माग धरतात, त्यांच्यावर ते प्रीती करतात.
10 There is severe discipline for the one who leaves the path, and whoever hates correction will die. जे सत्याचा मार्ग सोडतात, कठोर शिक्षा त्यांची वाट पाहते; आणि जे सुधारणेचा तिरस्कार करतील ते मृत्युमुखी पडतील.
11 The grave and Destruction lie open before our Father; how much more the hearts of all people! मृत्यू आणि नाश याहवेह यांच्या दृष्टीपुढे आहेत— त्याअर्थी त्यांना मानवी हृदयाचे ज्ञान कितीतरी अधिक असेल!
12 A scoffer does not love to be corrected; he will not go to the wise. उपहास करणार्‍यांना सुधारणेचा राग येतो, म्हणून ते ज्ञानी लोकांस टाळतात.
13 A glad heart makes a cheerful face, but a sorrowful heart crushes the spirit. आनंदी मन चेहरा उल्हासित करते, आणि शोकाकुल हृदयाने आत्मा खिन्न होतो.
14 A discerning heart seeks knowledge, but the mouths of fools feed on foolishness. सुज्ञ अंतःकरण ज्ञानाचा माग घेते, परंतु मूर्खाच्या मुखाचे मूर्खतेनेच पोषण होते.
15 All the days of the afflicted are hard, but a cheerful heart has a continual feast. पीडित मनुष्याचे सर्व दिवस क्लेशपूर्ण असतात, परंतु आनंदी अंतःकरणासाठी सर्व दिवस उत्सवाचे असतात.
16 Better a little with the fear of our Father than great treasure and trouble with it. अपार समृद्धी व त्यासोबत येणारी संकटे असणे, यापेक्षा याहवेहचे भय बाळगून मिळविलेले थोडेसे धन बरे.
17 Better a meal of vegetables where there is love than a fattened ox with hatred. तिरस्काराने वाढलेल्या पुष्ट वासराच्या मेजवानीपेक्षा प्रीतीने वाढलेले थोडेसे शाकाहारी जेवण बरे.
18 A hot-tempered man stirs up strife, but one who is slow to anger calms a quarrel. तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो, तर शांत स्वभावाचा मनुष्य तंटा मिटवितो.
19 The way of the lazy is like a hedge of thorns, but the path of the upright is a level highway. आळशी माणसाच्या वाटेवर काटेरी कुंपणासारखे अडथळे असतात, परंतु नीतिमानाची वाट राजमार्ग असतो.
20 A wise son makes a glad father, but a foolish man despises his mother. समंजस पुत्र आपल्या वडिलांना आनंद देतो, परंतु मूर्ख मनुष्य आईला तुच्छ लेखतो.
21 Foolishness is joy to one who lacks sense, but a person of understanding walks a straight path. मूर्खपणा विवेकहीन मनुष्यास आनंदित करतो, पण विवेकशील मनुष्य सरळ मार्ग धरून राहतो.
22 Plans fail without counsel, but with many advisers they succeed. उपयुक्त सल्लागार नसले की योजना विफल होतात; परंतु अनेक सल्लागारांमुळे योजना यशस्वी होतात.
23 A person finds joy in giving an apt reply, and how good is a word at the right time! समर्पक उत्तर देण्यात प्रत्येकाला आनंद वाटतो— योग्य वेळी उपयुक्त सल्ला मिळणे किती महत्त्वाचे आहे!
24 The path of life leads upward for the prudent, turning him away from the grave below. सुज्ञासाठी जीवनाचा मार्ग वर चढविणारा असतो तो त्याला खाली मृतलोकात जाण्यापासून रोखतो.
25 Our Father tears down the house of the proud, but he protects the widow's boundary. गर्विष्ठांच्या घराचा याहवेह नाश करतात, परंतु ते विधवांची दगडी सीमा सुरक्षित ठेवतात.
26 The thoughts of the wicked are detestable to our Father, but gracious words are pure. दुष्टाच्या विचारांचा याहवेह द्वेष करतात, परंतु प्रेमळ शब्द त्यांच्या दृष्टीने निर्मळ असतात.
27 Whoever is greedy for unjust gain brings trouble on his own household, but the one who hates bribes will live. लोभी माणसे त्यांच्या परिवारांवर विनाश आणतात, परंतु जो लाच घेणे घृणित मानतो, तो जगेल.
28 The heart of the righteous weighs how to answer, but the mouth of the wicked pours out evil. नीतिमानाचे अंतःकरण विचारांती उत्तर देते, परंतु दुष्टाच्या मुखातून दुर्वचनाचा प्रवाह निघतो.
29 Our Father is far from the wicked, but he hears the prayer of the righteous. याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात, पण धार्मिकांच्या प्रार्थना मात्र ते ऐकतात.
30 The light of the eyes brings joy to the heart, and good news refreshes the bones. निरोप्याच्या नजरेतील चमक हृदयाला आनंद देते, आणि शुभवार्ता हाडांना आरोग्य देते.
31 The ear that listens to life-giving correction will dwell among the wise. जीवनदायी शिक्षणाकडे जो काळजीपूर्वक लक्ष देतो, तो सुज्ञांसह वास करेल.
32 Whoever ignores instruction despises himself, but whoever listens to correction gains understanding. जे शिस्तीकडे दुर्लक्ष करतात ते स्वतःचा तिरस्कार करतात, परंतु जो सुधारणेकडे लक्ष लावतो तो समंजसपणा प्राप्त करतो.
33 The fear of our Father is the instruction of wisdom, and humility comes before honor. याहवेहचे भय धरणे हेच सुज्ञतेचे शिक्षण होय, आणि सन्मान मिळण्याआधी विनम्रता येते.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]