Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 12 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Whoever loves discipline loves knowledge, but whoever hates correction is senseless. जो अनुशासन प्रिय असतो, त्याला ज्ञान प्रिय असते, परंतु ज्याला सुधारणा अप्रिय आहे, तो मूर्ख होय.
2 A good man obtains favor from our Father, but he condemns the man who schemes evil. नीतिमान लोकांना याहवेहची कृपा प्राप्त होते, पण दुष्ट योजना रचणार्‍या मनुष्याला याहवेह दोषी ठरवितात.
3 No one is established by wickedness, but the root of the righteous will never be moved. दुष्टाईने मनुष्य जीवनात स्थिर होत नाही, परंतु नीतिमानाचे मूळ कधीही उखडले जाऊ शकत नाही.
4 A wife of noble character is her husband's crown, but one who brings shame is like decay in his bones. सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे, परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे.
5 The plans of the righteous are just, but the advice of the wicked is deceitful. नीतिमान मनुष्याची योजना न्याय्य असते, परंतु दुष्टाचा सल्ला कपटी असतो.
6 The words of the wicked lie in wait for blood, but the speech of the upright rescues the innocent. दुष्टांचे शब्द रक्तपात करण्यासाठी टपून बसतात परंतु नीतिमानाची वाणी त्यांची सुटका करते.
7 The wicked are overthrown and are no more, but the house of the righteous will stand. दुर्जन उलथून टाकले जातात आणि ते नाहीसे होतात, परंतु नीतिमानाचे घराणे स्थिर उभे असते.
8 A person is praised according to their good sense, but one with a warped mind is despised. मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेच्या प्रमाणात होते, परंतु विकृत बुद्धीचा मनुष्य घृणित लेखला जातो.
9 Better to be lowly and have a servant than to pretend to greatness and go hungry. स्वतःला प्रतिष्ठित दर्शवून अन्नाचा अभाव असण्यापेक्षा सर्वसामान्य असून जवळ चाकर बाळगणारा असणे बरे.
10 The righteous care for the needs of their animals, but even the mercy of the wicked is cruel. नीतिमान मनुष्य आपल्या पशूच्या गरजांची काळजी घेतो, परंतु दुष्ट लोकांच्या अत्यंत दयेची कार्येही क्रूर असतात.
11 Whoever works their land will have plenty of food, but whoever chases worthless pursuits lacks sense. जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल, परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात, तो अक्कलशून्य असतात.
12 The wicked crave the plunder of evil men, but the root of the righteous yields fruit. दुष्ट मनुष्य दुर्जनांच्या लुटीची इच्छा करतो, परंतु नीतिमानाचे मूळ टिकून राहते.
13 An evil man is trapped by his sinful talk, but the righteous escapes from trouble. दुष्ट माणसे त्यांच्या वाईट बोलण्याने जाळ्यात सापडतात, आणि निर्दोष मनुष्य संकटातून बाहेर पडतो.
14 From the fruit of their words a person is filled with good things, and the work of their hands comes back to reward them. ओठांच्या फळांनी मनुष्याला उत्तम गोष्टी लाभतात, आणि हाताने केलेले परिश्रम त्यांना बक्षीस मिळवून देतात.
15 The way of a fool seems right in his own eyes, but the wise listen to advice. मूर्खाच्या दृष्टीने त्याचाच मार्ग योग्य असतो; परंतु जो शहाणा असतो, तो सल्ला ऐकतो.
16 A fool shows his anger at once, but the prudent overlook an insult. मूर्ख आपला क्रोध तत्काळ दर्शवितो, परंतु सुज्ञ मनुष्य अपमानाकडे दुर्लक्ष करतो.
17 Whoever speaks the truth gives honest testimony, but a false witness tells lies. प्रामाणिक साक्षीदार सत्य बोलतो, परंतु खोटा साक्षीदार लबाड बोलतो.
18 Reckless words pierce like a sword, but the tongue of the wise brings healing. निष्काळजीपणाने बोललेला शब्द तलवारीसारखा वेध घेतो, पण सुज्ञ मनुष्याचे बोलणे आरोग्यदायी असते.
19 Truthful lips endure forever, but a lying tongue lasts only a moment. सत्याची वाणी काळाच्या कसोटीला उतरते; लबाड जिव्हा ही क्षणिक आहे.
20 Deceit fills the hearts of those who plot evil, but joy belongs to those who promote peace. दुष्ट योजना करणार्‍यांच्या हृदयात कपट असते, पण शांतीची मसलत देणार्‍यांच्या हृदयात आनंद असतो.
21 No harm overtakes the righteous, but the wicked are full of trouble. न्यायी मनुष्यावर काहीही आपत्ती येणार नाही, परंतु दुष्ट लोक आपत्तींनी व्याप्त होतात.
22 Lying lips are detestable to our Father, but those who act faithfully are his delight. असत्य बोलणार्‍या ओठांची याहवेह घृणा करतात, परंतु विश्वसनीय लोक त्यांना प्रसन्न करतात.
23 The prudent keep their knowledge to themselves, but the heart of fools blurts out foolishness. सुज्ञ मनुष्य आपले ज्ञान प्रकट करीत नाही, परंतु मूर्खाचे हृदय मूर्खपणाचे प्रसरण करतात.
24 Diligent hands will rule, but laziness ends in forced labor. उद्योगी मनुष्यांचे हात सत्ता धारण करतील, पण आळशी लोकांना गुलामगिरी प्राप्त होईल.
25 Anxiety weighs down the heart, but a kind word cheers it up. चिंता हृदयावर दबाव आणते, परंतु कोमल शब्द ते आनंदित करते.
26 The righteous guide their neighbor, but the way of the wicked leads them astray. नीतिमान आपल्या मित्रांची काळजीपूर्वकरित्या निवड करतो, परंतु दुष्ट लोकांचा मार्ग त्यांनाच बहकवितो.
27 The lazy do not roast their game, but the diligent prize their possessions. आळशी मनुष्याला शिकार मिळत नाही, परंतु उद्योगी मनुष्याला भरपूर मिळकत प्राप्त होते.
28 In the path of righteousness there is life, and along that way there is no death. नीतिमानाचा मार्ग जीवनाकडे जातो, व त्याच मार्गामधून अमरत्व मिळते.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]