Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 11 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Dishonest scales are an abomination to our Father, but accurate weights are his delight. खोट्या तराजूंचा याहवेह तिरस्कार करतात, परंतु अचूक वजनांमुळे त्यांना संतोष होतो.
2 When pride comes, then comes disgrace, but wisdom comes with the humble. जेव्हा गर्विष्ठपणा येतो, तेव्हा अप्रतिष्ठा येते, परंतु विनम्रपणामुळे सुज्ञता प्राप्त होते.
3 The integrity of the upright guides them, but the crookedness of the treacherous destroys them. नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो, परंतु दुटप्पीपणा विश्वासघातकी लोकांचा नाश करतो.
4 Wealth does not profit in the day of wrath, but righteousness delivers from death. प्रकोपाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी असते, परंतु नीतिमत्व मृत्यूपासून सोडविते.
5 The righteousness of the blameless makes their way straight, but the wicked falls by his own wickedness. निर्दोष मनुष्यांची नीतिमत्ता त्यांचे मार्ग सरळ ठेवते, परंतु दुष्ट लोक स्वतःच्या वाईट कृत्यांमुळे पतन पावतात.
6 The righteousness of the upright delivers them, but the treacherous are trapped by their own craving. नीतिमानाची नीतिमत्ता त्यांची सुटका करते, परंतु विश्वासघातकी त्यांच्या वाईट इच्छांच्या सापळ्यात अडकतात.
7 When a wicked person dies, his hope perishes, and his confidence in his own strength comes to nothing. मर्त्य मानवांच्या मृत्यूने त्यांच्यावर ठेवलेली आशा नष्ट होते, त्यांच्या बळाने दिलेली सर्व अभिवचने निष्फळ होतात.
8 The righteous is delivered from trouble, and the wicked comes into it in his place. नीतिमान मनुष्याची संकटातून सुटका होते, आणि त्याऐवजी दुष्ट मनुष्य संकटात पडतो.
9 With his mouth the godless destroys his neighbor, but through knowledge the righteous are delivered. भक्तिहीनाच्या मुखातील शब्दांनी त्यांच्या शेजार्‍याचा नाश होतो, परंतु नीतिमानांचे ज्ञान त्यांना नाशापासून वाचवते.
10 When things go well for the righteous, the city rejoices, and when the wicked perish, there are shouts of joy. जेव्हा नीतिमानांना यश मिळते, तेव्हा नगर आनंदित होते; जेव्हा दुष्टांचा नाश होतो, तेव्हा जयघोषाचा निनाद होतो.
11 By the blessing of the upright a city is exalted, but by the mouth of the wicked it is torn down. नीतिमानांच्या आशीर्वादाने नगरास प्रतिष्ठा मिळते, परंतु दुष्टांच्या वक्तव्यांनी नगराचा नाश होतो.
12 Whoever despises his neighbor lacks sense, but a person of understanding stays silent. विवेकहीन मनुष्य आपल्या शेजार्‍याची निंदा करतो; परंतु सुज्ञ मनुष्य आपल्या जिभेला लगाम घालतो.
13 A gossip goes about revealing secrets, but someone with a trustworthy spirit can keep a secret. चहाडी करण्याने विश्वासघात होतो, परंतु विश्वासपात्र मनुष्य गुपित उघड करीत नाही.
14 Where there is no guidance, a people falls, but in an abundance of counselors there is safety. मार्गदर्शन नसल्यामुळे राष्ट्राचे पतन होते, परंतु अनेक सल्लागार असल्याने विजय प्राप्त होतो.
15 Whoever puts up security for a stranger will surely suffer for it, but whoever hates shaking hands on a pledge is secure. अपरिचितासाठी जामीन राहिल्यास निश्चितच नुकसान होते, परंतु जो जामीनकीच्या हात मिळवणी नकार देतो तो सुरक्षित राहतो.
16 A gracious woman attains honor, and ruthless men attain riches. दयाळू अंतःकरणाची स्त्री सन्मान संपादन करते, परंतु क्रूर पुरुष केवळ धन संपादन करतो.
17 A kind person benefits himself, but a cruel person brings trouble on himself. दयाळू मनुष्य स्वतःचे भले करतो, परंतु क्रूर माणसे स्वतःवर नाश ओढवून घेतात.
18 The wicked earns deceptive wages, but whoever sows righteousness earns a true reward. दुष्ट मनुष्याला मिळणारे वेतन फसवे असते; परंतु जो नीतिमत्तेचे बीज पेरतो त्याला निश्चितच बक्षीस मिळते.
19 Whoever is steadfast in righteousness finds life, but whoever pursues evil runs to his own death. खरोखरच नीतिमानाला जीवन प्राप्त होते, परंतु दुष्कर्मांच्या मागे लागणारा मृत्यू ओढवून घेतो.
20 Those of crooked heart are an abomination to our Father, but those whose ways are blameless are his delight. याहवेह विकृत अंतःकरणाच्या लोकांचा तिरस्कार करतात, परंतु निर्दोष मार्गाने चालणारे त्यांना प्रसन्न करतात.
21 You can be sure the evil person will not go unpunished, but the children of the righteous will go free. याची खात्री असू दे: दुष्टाला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, परंतु जे नीतिमान आहेत त्यांची सुटका होईल.
22 Like a gold ring in a pig's snout is a beautiful woman who shows no discretion. विवेकहीन सुंदर स्त्री जणू डुकराच्या नाकातील सोन्याची नथच समजावी.
23 The desire of the righteous ends only in good, but the hope of the wicked ends in wrath. नीतिमानाच्या इच्छेचा परिणाम चांगलाच असतो, परंतु दुष्टाची आशा केवळ प्रक्रोपच आणते.
24 One person gives freely, yet grows all the richer; another withholds what is right, only to end up in need. एक मनुष्य सढळ हाताने देतो, तरी देखील तो समृद्ध होतो, दुसरा मनुष्य दान देणे उगाच नाकारतो आणि तो दरिद्री बनतो.
25 A generous soul will be enriched, and whoever refreshes others will himself be refreshed. उदार मनुष्याची समृद्ध होईल; आणि जो दुसर्‍याला प्रोत्साहित करतो, तो स्वतः प्रोत्साहित होईल.
26 The people curse whoever holds back grain, but the one who sells it is blessed. जो धान्य अडवून ठेवतो, त्याला लोक शाप देतात, परंतु जो विकण्यास इच्छुक असतो, त्याच्यासाठी लोक आशीर्वादाची प्रार्थना करतात.
27 Whoever diligently seeks good seeks favor, but whoever searches for evil, evil will come to him. जो चांगल्या गोष्टींचा शोध घेतो त्याला कृपा प्राप्त होते, परंतु जो वाईटाचा शोध घेतो त्याला तेच प्राप्त होते.
28 Whoever trusts in his riches will fall, but the righteous will flourish like green leaves. जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, तो नाश पावतील, परंतु नीतिमान मनुष्य हिरव्या पानाप्रमाणे बहरेल.
29 Whoever brings trouble on his own household will inherit the wind, and the fool will be servant to the wise of heart. जो कोणी त्याच्या कुटुंबाचा नाश करतो, त्याला वारसा म्हणून केवळ वारा मिळेल, आणि मूर्खाला शहाण्याचा दास व्हावे लागेल.
30 The fruit of the righteous is a tree of life, and whoever wins souls is wise. नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो सुज्ञ आहे तो आत्मे जिंकतो.
31 If the righteous is repaid on earth, how much more the wicked and the sinner! जर नीतिमान लोकांना पृथ्वीवरच प्रतिफळ मिळते, तर मग अनीतिमान व पापी लोकांना किती मोठ्या प्रमाणात मिळेल!
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]