Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 10 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 The proverbs of Solomon: A wise son brings joy to his father, but a foolish son brings grief to his mother. शलोमोनाची नीतिसूत्रे: शहाणा मुलगा त्याच्या पित्याला सुखी करतो, परंतु मूर्ख मुलगा त्याच्या आईला दुःख देतो.
2 Treasures gained by wickedness do not profit, but righteousness rescues from death. दुष्टाईने मिळविलेल्या संपत्तीस कायमचे मूल्य नसते परंतु धार्मिकता मृत्यूपासून सोडविते.
3 Our Father will not let the righteous go hungry, but he thwarts the craving of the wicked. याहवेह नीतिमान मनुष्याची उपासमार होऊ देत नाहीत, परंतु दुष्टांची लालसा ते विफल करतात.
4 Lazy hands make you poor, but diligent hands bring wealth. आळशी हात दरिद्री आणतो, परंतु उद्योगी हात समृद्धी आणतो.
5 He who gathers in summer is a prudent son, but he who sleeps during harvest is a son who brings shame. जो उन्हाळ्यात धान्याचा संचय करतो तो शहाणा पुत्र होय; परंतु जो कापणीच्या हंगामात झोपून राहतो, तो लज्जेचे कारण होतो.
6 Blessings rest on the head of the righteous, but the mouth of the wicked conceals violence. आशीर्वाद हे नीतिमानाच्या मस्तकावरील मुकुट आहेत, परंतु दुष्ट मनुष्याच्या मुखात हिंसाचार दडलेला असतो.
7 The memory of the righteous is a blessing, but the name of the wicked will rot. आशीर्वाद देण्यासाठी धार्मिक मनुष्याच्या नावाचा उपयोग करतात, परंतु दुष्ट मनुष्याचे नाव सडून नाहीसे होते.
8 A wise heart accepts commands, but a babbling fool comes to ruin. सुज्ञ अंतःकरणाचा मनुष्य आज्ञेचे पालन करतो, परंतु मूर्खपणाची बडबड करणार्‍या नाश होतो.
9 Whoever walks in integrity walks securely, but he who makes his ways crooked will be found out. सात्विक व सरळ जीवन जगणारा निर्भयतेने चालतो, परंतु जो वाकड्या मार्गानी चालतो तो पकडला जाईल.
10 Whoever winks causes trouble, and a babbling fool comes to ruin. जो दुष्टतेने डोळे मिचकावितो तो दुःखाचे कारण होतो, परंतु मूर्खपणाची बडबड करणार्‍या नाश होतो.
11 The mouth of the righteous is a fountain of life, but the mouth of the wicked conceals violence. नीतिमान मनुष्याचे मुख जीवनाचा झरा आहे, परंतु दुष्टाचे मुख हिंसाचाराचे कोठार आहे.
12 Hatred stirs up conflict, but love covers all offenses. द्वेष कलहास चेतावणी देतो; परंतु प्रीती सर्व अपराधांवर आच्छादन टाकते.
13 On the lips of the discerning, wisdom is found, but a rod is for the back of one who lacks sense. बुद्धिमानाच्या ओठावर सुज्ञान वास करते, परंतु विवेकहीन माणसाच्या पाठीला काठीच योग्य ठरते.
14 The wise store up knowledge, but the mouth of a fool invites ruin. सुज्ञ ज्ञानाचा साठा करतात, परंतु मूर्खाचे तोंड नाश ओढवून घेते.
15 The wealth of the rich is their fortified city; the ruin of the poor is their poverty. धनवानाचे धन हे त्यांचे तटबंदीचे नगर आहे, दारिद्र्य गरिबाचा नाश आहे.
16 The wage of the righteous leads to life; the gain of the wicked leads to sin. नीतिमान मनुष्याचे वेतन जीवन आहे, परंतु दुष्ट मनुष्याचे कमाई पाप आणि मृत्यू हेच आहेत.
17 Whoever accepts discipline is on the path to life, but he who ignores correction leads others astray. जो शिस्तीचे पालन करतो तो जीवनाचा मार्ग दाखवितो परंतु जो सुधारणा नाकारतो, तो दुसर्‍यांची दिशाभूल करतो.
18 Whoever conceals hatred is a liar, and whoever spreads slander is a fool. जो लबाडीच्या ओठांनी आपला द्वेष गुप्त ठेवितो, आणि चहाडी करीत फिरतो, तो मूर्ख होय.
19 Where words are many, sin is never absent; but whoever holds his tongue is wise. शब्द बहुगुणित करून पापाचा अंत होत नसतो; पण सुज्ञ लोक त्यांच्या जिभेवर ताबा ठेवतात.
20 The tongue of the righteous is choice silver; the heart of the wicked is worth little. नीतिमान मनुष्याची जिव्हा उत्तम चांदीप्रमाणे असते; परंतु दुष्टाच्या अंतःकरणास क्षुल्लक किंमत असते.
21 The lips of the righteous nourish many, but fools die for lack of sense. नीतिमान मनुष्याचे ओठ अनेकांचे पोषण करतात; परंतु मूर्ख लोक विवेकाच्या अभावी नाश पावतात.
22 The blessing of our Father brings wealth, and he adds no sorrow with it. याहवेहच्या आशीर्वादाने धनसंपत्ती मिळते, त्यासाठी दुःखद परिश्रम करावे लागत नाहीत.
23 Doing wickedness is a game to a fool, but wisdom is the delight of a person of understanding. दुष्कर्म करण्यात मूर्खाला मौज वाटते, परंतु सुज्ञ मनुष्य सुज्ञानात आनंदित होतो.
24 What the wicked dreads will come upon him, but the desire of the righteous will be granted. दुष्ट ज्याला भितो, तेच त्याच्यावर येईल; नीतिमान मनुष्याच्या इच्छा फलद्रूप होतील.
25 When the storm has passed, the wicked are gone, but the righteous are established forever. वावटळ येते आणि निघून जाते, तसा दुष्ट नाहीसा होतो, परंतु नीतिमान सर्वकाळ स्थिर उभा राहतो.
26 Like vinegar to the teeth and smoke to the eyes, so is the sluggard to those who send him. जशी आंब दातांस आणि धूर डोळ्यास, तसा आळशी मनुष्य त्याला पाठविणाऱ्यास आहे.
27 The fear of our Father lengthens life, but the years of the wicked will be cut short. याहवेहचे भय बाळगल्याने मनुष्याचे आयुष्य वाढते, परंतु दुष्टांच्या आयुष्याची वर्षे कमी केली जातील.
28 The hope of the righteous brings joy, but the expectation of the wicked will perish. नीतिमानाची अपेक्षा त्याला आनंद देते, परंतु दुष्टाची आशा फोल ठरते.
29 The way of our Father is a refuge for the blameless, but ruin for those who do evil. याहवेहचा मार्ग निर्दोष मनुष्याचे आश्रयस्थान आहे, परंतु जे दुष्कर्म करतात त्यांच्यासाठी तो नाश आहे.
30 The righteous will never be shaken, but the wicked will not remain in the land. नीतिमान लोक कधीही उपटून टाकले जाणार नाहीत, परंतु दुष्ट लोक भूमीवर राहणार नाहीत.
31 The mouth of the righteous yields wisdom, but the perverse tongue will be cut off. धार्मिक मनुष्याच्या मुखाद्वारे सुज्ञानाचे फळ निघते; परंतु विकृत जिभेला शांत केले जाईल.
32 The lips of the righteous know what is acceptable, but the mouth of the wicked, only what is perverse. नीतिमानांच्या ओठास कृपा कशी मिळवावी हे कळते, परंतु दुष्ट लोकांचे मुख फक्त विकृतीच जाणते.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]