Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 9 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Wisdom has built her house; she has hewn out her seven pillars. सुज्ञानाने आपले घर बांधले आहे; तिने तिचे सात खांब तयार केले आहेत.
2 She has slaughtered her animals; she has mixed her wine; she has also set her table. तिने तिच्याकडील मांसाहारी भोजन आणि तिचा द्राक्षारस तयार केला आहे; तिने तिचा मेजसुद्धा सजविलेला आहे.
3 She has sent out her young women to call from the highest places of the town: तिने तिच्या दासांना बाहेर पाठवले आहे आणि ती नगराच्या सर्वात उच्च स्थानावरून हाक मारते,
4 "Whoever is simple, let him come in here!" To the one who lacks sense she says, “जे साधे भोळे आहेत, त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते,
5 "Come, eat my bread and drink the wine I have mixed. “इकडे या, माझे भोजन खा आणि मी मिसळलेला द्राक्षारस प्या.
6 Leave your simple ways, and live; walk in the way of insight." तुमचे साधेभोळेपण सोडून द्या म्हणजे तुम्ही जगाल; अंतर्ज्ञानाच्या मार्गाने चला.”
7 Whoever corrects a mocker brings abuse on himself, and whoever rebukes a wicked man gets hurt. जो टवाळखोराची सुधारणा करतो, तो अपमानास आमंत्रण देतो; जो दुष्टाला धमकावितो त्याला अपशब्द ऐकावे लागतात.
8 Do not rebuke a mocker, or he will hate you; rebuke a wise man, and he will love you. टवाळखोरांची कान उघाडणी करू नकोस, नाहीतर ते तुझा द्वेष करतील, सुज्ञ माणसांची कान उघाडणी कर आणि ते तुजवर प्रीती करतील.
9 Instruct a wise man and he will grow wiser; teach a righteous man and he will learn even more. सुज्ञ मनुष्याला बोध कर म्हणजे ते अधिक ज्ञानी होतील; नीतिमानाला शिक्षण दे आणि ते त्यांच्या शिक्षणात भर घालतील.
10 The fear of our Father is the beginning of wisdom, and the knowledge of the Holy One is insight. याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, आणि पवित्र परमेश्वराचे ज्ञान असणे हा सुज्ञपणा होय.
11 For by me your days will be multiplied, and years will be added to your life. कारण सुज्ञतेद्वारे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, आणि तू उदंड आयुष्य जगशील.
12 If you are wise, you are wise for yourself; if you scoff, you alone will bear it. जर तू सुज्ञ असशील, तर तुझे सुज्ञान तुला बक्षीस देईल; जर तू टवाळखोर आहेस, तर तू एकटाच यातना भोगशील.
13 The woman Folly is loud; she is naive and knows nothing. मूर्खपणा एक स्वैर स्त्री आहे; ती साधीभोळी आहे आणि तिला काहीच समज नाही.
14 She sits at the door of her house, on a seat at the highest places of the town, ती तिच्या घराच्या दारात बसून राहते, तसेच नगराच्या सर्वात उंच ठिकाणावर ती बसते.
15 calling to those who pass by, who are going straight on their way: तिच्याजवळून जाणाऱ्या, जे सरळ त्यांच्या मार्गाने जातात, त्यांना ती बोलाविते,
16 "Whoever is simple, let him come in here!" And to the one who lacks sense she says, “जे साधे भोळे आहेत त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते,
17 "Stolen water is sweet, and bread eaten in secret is pleasant." “चोरलेले पाणी गोड लागते; गुप्तपणे खाल्लेले अन्न चविष्ट लागते!”
18 But he does not know that the dead are there, that her guests are in the depths of the grave. परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथे मेलेले लोक आहेत, आणि तिचे पाहुणे आता मृतांच्या खोल जगात आहेत.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]