Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 8 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Does not Wisdom call out, and understanding raise her voice? सुज्ञान हाक मारीत नाही काय? समंजसपणा तिचा आवाज उंचावत नाही का?
2 Atop the heights along the way, where the paths meet, she takes her stand. रस्त्याच्या कडाला असलेल्या सर्वात उंच जागेवर, जिथे रस्ते जोडले जातात, तिथे ती उभी राहते;
3 Beside the gates, at the entrance to the city, at the doorways she cries aloud: शहरात जाणार्‍या वेशीच्या बाजूला, प्रवेशद्वाराजवळ ती ओरडून सांगते:
4 "To you, all people, I call out; my voice reaches all humanity. “अहो लोकांनो, मी तुम्हाला बोलाविते; सर्व मानवजातीला उद्देशून मी माझा आवाज उंचाविते.
5 You who are simple, learn prudence; you who are foolish, gain an understanding heart. तुम्ही जे साधे भोळे आहात, समंजसपणा मिळवा; तुम्ही जे मूर्ख आहात, तुमचे लक्ष तिच्याकडे लावा.
6 Listen, for I speak of noble things, and everything I say is right. ऐका! कारण मला काही विश्वसनीय गोष्टी सांगावयाच्या आहेत; योग्य ते सांगण्यासाठीच मी माझे मुख उघडते.
7 My mouth utters truth, for my lips detest wickedness. माझे मुख सत्य बोलते, कारण माझे ओठ वाईटाचा तिरस्कार करतात.
8 All the words of my mouth are righteous; none of them is twisted or crooked. माझ्या मुखातील सर्व शब्द नीतियुक्त आहेत; त्यातील कोणतेही कुटिल किंवा विकृत नाहीत.
9 To the one who understands they are all clear, and right to those who find knowledge. जे समजूतदार आहेत त्यांच्यासाठी ते योग्य आहेत; ज्यांना ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांना माझी वचने सुबोध आहेत.
10 Take my instruction instead of silver, and knowledge rather than choice gold, चांदीऐवजी माझ्या शिक्षणाची, आणि उत्कृष्ट सोन्यापेक्षा ज्ञानाची निवड कर.”
11 for wisdom is better than jewels, and nothing you desire can compare with her. कारण सुज्ञान माणकांपेक्षा उत्तम आहे; तुला आवडणाऱ्या इतर कशाशीही तिची तुलना करता येणार नाही.
12 I, Wisdom, dwell with prudence, and I find knowledge and discretion. मी, सुज्ञान, सुज्ञतेबरोबर सहवास करते; ज्ञान आणि विवेक माझ्याकडे आहेत.
13 The fear of our Father is to hate evil. Pride and arrogance, the evil way, and perverse speech I hate. याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय. गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा, वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते.
14 Counsel is mine, and sound wisdom; I am understanding; strength is mine. सल्ला आणि अचूक न्याय माझे आहेत; माझ्याकडे अंतर्ज्ञान आणि शक्ती आहे.
15 By me kings reign, and rulers decree what is just; माझ्याद्वारे राजे राज्य करतात, आणि शासन करणारे योग्य तो हुकूमनामा देतात;
16 by me princes govern, and nobles—all who rule with justice. माझ्याच साहाय्याने अधिपती, आणि थोर—पृथ्वीवरील सर्व नीतिमान शासक अधिकार चालवितात.
17 I love those who love me, and those who search for me find me. जे माझ्यावर प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते, आणि जे माझा शोध घेतात त्यांना मी सापडते.
18 With me are riches and honor, enduring wealth and righteousness. माझ्याजवळ समृद्धी आणि सन्मान, कायम टिकणारी संपत्ती आणि वैभव आहे.
19 My fruit is better than gold, than the finest gold, and what I yield surpasses choice silver. माझे फळ शुद्ध सोन्यापेक्षा चांगले आहे; आणि माझ्याद्वारे उत्पन्न झालेले उत्कृष्ट चांदीपेक्षा उत्तम आहे.
20 I walk in the way of righteousness, along the paths of justice, मी नीतिमत्वाच्या मार्गाने चालते, आणि न्याय्यमार्गाला धरून राहते,
21 giving wealth as an inheritance to those who love me, and filling their treasuries. माझ्यावर प्रीती करणाऱ्यांना मी समृद्ध वारसा देते. आणि त्यांची भांडारे मी भरून टाकते.
22 Our Father brought me forth at the beginning of his way, before his works of old. याहवेहनी त्यांच्या सृष्टी निर्मितीमध्ये, त्यांच्या पुरातन कार्यापूर्वी सर्वप्रथम माझी रचना केली;
23 From ages past I was established, from the beginning, before the earth began. अनादिकालापासून माझी रचना केलेली होती. जेव्हा जग अस्तित्वात आले तेव्हाच.
24 When there were no deep waters I was brought forth, when there were no springs overflowing with water. जेव्हा महासागर नव्हते, माझा जन्म झाला होता, तेव्हा ओसांडून वाहणारे झर्‍यांचे पाणीही नव्हते;
25 Before the mountains were settled, before the hills, I was brought forth, पर्वत त्यांच्या जागेवर स्थिर झाले नव्हते, डोंगर निर्माण होण्यापूर्वी माझा जन्म झाला होता,
26 while he had not yet made the earth and its fields, or the first dust of the world. त्यांनी पृथ्वी किंवा तिच्यावरील शेती किंवा पृथ्वीवरील धूळ निर्माण करण्यापूर्वी,
27 When he set the heavens in place, I was there; when he drew a circle over the face of the deep, त्यांनी जेव्हा आकाशास त्याच्या ठिकाणी स्थापित केले, जेव्हा त्यांनी महासागरावर क्षितिजाची सीमा निश्चित केली तेव्हा मी तिथे होते,
28 when he set the skies in place above, when he established the springs of the deep, जेव्हा त्यांनी वर अंतराळात ढगांची प्रस्थापना केली आणि पृथ्वीगर्भातील झर्‍यांना घट्ट बसविले,
29 when he set for the sea its boundary so the waters would not cross their limits, when he marked out the foundations of the earth, जेव्हा त्यांनी सागरांना त्यांच्या मर्यादा घालून दिल्या, जेणेकरून पाणी त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही. जेव्हा त्यांनी पृथ्वीचा पाया घातला,
30 then I was beside him as a master craftsman, and I was his daily delight, rejoicing before him always, तेव्हा मी सतत त्यांच्याभोवती होते; दिवसेंदिवस मी आनंदाने भरून गेले होते. नेहमी त्यांच्या उपस्थितीचा आनंद मी घेत होते,
31 rejoicing in his whole world, and delighting in the human family. त्यांच्या संपूर्ण जगामध्ये मी आनंदात आहे आणि मानवजातीमध्ये आनंद करीत आहे.
32 And now, my children, listen to me: blessed are those who keep my ways. “आणि म्हणून मुलांनो, माझे ऐका, कारण जे माझी शिकवण आचरतात, ते खूप आशीर्वादित होतात.
33 Listen to instruction and be wise; do not ignore it. माझे शिक्षण कान देऊन ऐका आणि शहाणे व्हा; त्याचा अव्हेर करू नका.
34 Blessed is the one who listens to me, watching daily at my gates, waiting beside my doorway. जे व्यक्ती माझे ऐकतात ते धन्य आहेत, ते रोज माझ्या दारांवर लक्ष ठेऊन, माझ्या दारावर प्रतीक्षा करतात.
35 For whoever finds me finds life and receives favor from our Father. कारण ज्याला मी सापडते, त्याला जीवन सापडते, आणि त्याला याहवेहकडून कृपादृष्टी मिळते.
36 But whoever misses me harms his own soul; all who hate me love death." परंतु जे माझा शोध घेण्यास चुकतात, ते स्वतःचे नुकसान करून घेतात; जे सर्व माझा तिरस्कार करतात, ते मृत्यूची आवड धरतात.”
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]