Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Jonah 2 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

1मग माशाच्या पोटातून योनाहने याहवेह त्याच्या परमेश्वराची प्रार्थना केली. 2तो म्हणाला:“माझ्या संकटात मी याहवेहचा धावा केलाआणि त्यांनी मला उत्तर दिले.मृत्यूच्या खोल अधोलोकातून मी मदतीसाठी हाक मारलीआणि तुम्ही माझी हाक ऐकली.

3तुम्ही मला खोलवर,समुद्राच्या अगदी हृदयात फेकून दिलेआणि प्रवाहाने मला घेरले;आणि तुमच्या बेफाम लाटा आणि कल्लोळयांनी मला झाकून टाकले.

4मी म्हणालो, ‘मला तुमच्या नजरेसमोरूनदूर करण्यात आले आहे;तरीही मी तुमच्या पवित्र मंदिराकडेदृष्टी लावेन.’

5बुडविणार्‍या पाण्याने मला घाबरविले,माझ्या सभोवताली खोल डोह होता;माझे डोके समुद्राच्या शेवाळाने गुंडाळले होते.

6मी पर्वतांच्या मुळाशी पोहोचलो होतो;मी कायमचा जमिनीत बंदिस्त झालो होतो.तरीसुद्धा, हे याहवेह माझ्या परमेश्वरा,तुम्ही माझा जीव खड्ड्यातून वर आणला.

7“जेव्हा माझे जीवन क्षीण होत होते,तेव्हा मी याहवेहचे स्मरण केले,आणि माझी प्रार्थना वर तुमच्याकडे,तुमच्या पवित्र मंदिराकडे पोहोचली.

8“जे निरुपयोगी मूर्तींना कवटाळून राहतातते स्वतःला परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर ठेवतात.

9परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने,तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन.मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन.मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ ”

10मग याहवेहने माशाला आज्ञा केली आणि त्याने योनाहला कोरड्या भूमीवर ओकून टाकले.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]