Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Isaiah 2 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 The word that Isaiah son of Amoz saw concerning Judah and Jerusalem. यहूदीया व यरुशलेमविषयी आमोजाचा पुत्र यशायाहने पाहिलेला दृष्टान्त:
2 In the last days the mountain of our Father's house will be firmly established as the highest of the mountains, raised above the hills, and all the nations will stream to it. पण शेवटच्या दिवसात याहवेहच्या मंदिराचे पर्वत बळकट व उंच असे स्थापित केले जाईल; सर्व पर्वतांपेक्षा ते उंचावले जाईल, आणि सर्व राष्ट्रे त्याकडे एकत्र येतील.
3 Many peoples will come and say, "Come, let us go up to the mountain of God, to his house, so he can teach us his ways and we can walk in his paths." For instruction will go out from Zion, and the word of our Father from Jerusalem. अनेक लोक येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.
4 He will judge between the nations and settle disputes for many peoples. They will beat their swords into plowshares and their spears into pruning hooks; nation will not lift up sword against nation, nor will they train for war anymore. ते राष्ट्रांमध्ये न्याय करतील, आणि अनेक लोकांमधील वाद मिटवतील. ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, व भाल्यांचे आकडे बनवतील. एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.
5 House of Jacob, come, let us walk in the light of our Father. याकोबाच्या वंशजा ये, आपण याहवेहच्या प्रकाशात चालू.
6 For you have abandoned your people, the house of Jacob, because they are filled with influences from the east and with fortune-tellers like the Philistines, and they have made alliances with foreigners. याहवेह, तुम्ही याकोबाच्या वंशजाचा तुमच्या लोकांचा त्याग केला आहे, ते पूर्वेकडील अंधश्रद्धेने भरून गेलेले आहेत; पलिष्टी लोकांप्रमाणे ते दुरात्म्यांशी संपर्क साधतात आणि मूर्तिपूजकांच्या रूढी त्यांनी स्वीकारल्या आहेत.
7 Their land is full of silver and gold, with no end to their treasures; their land is full of horses, with no end to their chariots. त्यांची भूमी चांदी आणि सोन्याने भरून गेली आहे; त्यांची संपत्ती अमाप आहे. चांदी व सोने यांचे अमाप खजिने आहेत. त्यांच्या भूमीत असंख्य घोडे आहेत; त्यांच्याकडे असंख्य रथही आहेत.
8 Their land is full of idols; they bow down to the work of their hands, to what their own fingers have made. सर्व भूमी मूर्तीनी भरली आहे; त्यांच्याच हस्तकृतींनी, जे त्यांच्या बोटांनी बनविले आहे, त्याला ते नमन करतात.
9 So mankind is brought low, and everyone is humbled—do not forgive them. म्हणून या लोकांचे पतन केले जाईल आणि सर्वजण नमविले जातील— त्यांना क्षमा करू नका.
10 Go into the rocks and hide in the dust from the dread of our Father and from the splendor of his majesty. याहवेहच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास कड्याकपारीत जा, जमिनीत लपून बसा!
11 The proud eyes of mankind will be brought low, and the arrogance of men will be humbled; our Father alone will be exalted in that day. उन्मताची नजर नमविली जाईल, आणि मनुष्याचा गर्व उतरविला जाईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.
12 For the Father of heaven's armies has a day in store against all that is proud and lofty, against all that is lifted up, so that it will be brought low, गर्विष्ठ आणि उद्धट लोकांना, जे सर्वकाही उच्च करण्यात आले आहे त्यांना नम्र करण्यासाठी, सर्वसमर्थ याहवेहने एक दिवस निर्धारित केला आहे—
13 against all the cedars of Lebanon, lofty and lifted up, and against all the oaks of Bashan, लबानोनाचे सर्व उंच व भव्य गंधसरू आणि बाशान येथील एलावृक्ष,
14 against all the high mountains and against all the lofty hills, उंच उंच पर्वत आणि सर्व उंच डोंगर,
15 against every high tower and against every fortified wall, प्रत्येक भव्य बुरूज, प्रत्येक तटबंदीची भिंत,
16 against all the ships of Tarshish and against every magnificent vessel. तार्शीशमधील प्रत्येक व्यापारी गलबत आणि बंदरातील डौलदार जहाजे, त्या दिवशी सर्व नष्ट होतील.
17 The arrogance of mankind will be humbled, and the pride of men brought low; our Father alone will be exalted in that day, मनुष्याचा सर्व अहंकार नमविला जाईल आणि मनुष्याचा गर्व खाली करण्यात येईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.
18 and the idols will completely vanish. सर्व मूर्तीचा समूळ उच्छेद होईल.
19 People will flee into the caves of the rocks and into holes in the ground from the dread of our Father and from the splendor of his majesty, when he rises to shake the earth. जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील आणि जमिनीतील खाचात लपतील.
20 In that day people will throw away their idols of silver and their idols of gold to the moles and bats, which they made for themselves to worship. त्या दिवशी लोक उपासना करण्यासाठी त्यांनी घडविलेल्या त्यांच्या चांदी व सोन्याच्या मूर्ती चिचुंद्र्या आणि वटवाघळे यांच्यापुढे फेकून देतील.
21 They will go into the clefts of the rocks and into the crevices of the cliffs from the dread of our Father and from the splendor of his majesty, when he rises to shake the earth. जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील डोंगराच्या लटकत्या कडांमध्ये लपतील.
22 Stop trusting in mere man, who has only breath in his nostrils. What good is he? मर्त्य मनुष्यांवर भरवसा करणे बंद कर ज्यांच्या नाकामध्ये केवळ एक श्वासच आहे. त्यांना इतका बहुमान का द्यावा?
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]