Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Isaiah 3 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 For look—the Father of heaven's armies is about to strip from Jerusalem and from Judah every support and supply: the whole supply of bread and the whole supply of water, आता बघा, प्रभू सर्वसमर्थ याहवेह यरुशलेम व यहूदीयाचा अन्नपुरवठा आणि पाठिंबा दोन्हीही बंद करणार आहेत— सर्व अन्नाचा पुरवठा आणि पाण्याचा पुरवठा,
2 the warrior and the soldier, the judge and the prophet, the fortune-teller and the elder, वीर योद्धे तथा सैनिक, न्यायाधीश आणि संदेष्टे, दैवप्रश्न करणारे आणि वडीलजन,
3 the commander of fifty and the man of rank, the counselor, the skilled craftsman, and the clever enchanter. पन्नास लोकांवर असलेला सेनाधिकारी आणि उच्च पदाधिकारी, सल्लागार, कुशल कारागीर आणि धूर्त मांत्रिक या सर्वांसहित अन्नाचा आणि पाण्याचा पुरवठा ते काढून घेणार आहेत.
4 "I will make mere boys their officials, and childish whim will rule over them. “मी किशोर मुलांना त्यांचा अधिकारी बनवेन; बालके त्यांच्यावर राज्य करतील.”
5 The people will oppress one another, each man against his neighbor; the young will rise up against the old, and the lowly against the honored." लोक एकमेकांवर अत्याचार करतील— पुरुषा विरुद्ध पुरुष, शेजाऱ्याविरुद्ध शेजारी. तरुण वृद्ध लोकांच्या विरोधात उठतील, मान्यवरांच्या विरोधात तुच्छ लोक उठतील.
6 A man will seize his brother in his father's house and say, "You have a coat—you be our leader; take charge of this heap of ruins." एखादा मनुष्य, आपल्या पित्याच्या घरात, आपल्या भावास धरून म्हणेल, “भाऊ, तुझ्याकडे अंगरखा आहे, तर तू आमचा पुढारी हो; या नासाडीच्या ढिगाऱ्याचा ताबा घे!”
7 But on that day he will cry out, "I am no healer! There is no bread and no coat in my house—you will not make me leader of the people." पण त्या दिवशी तो ओरडेल, “माझ्याकडे त्याचा इलाज नाही. माझ्या घरी अन्न किंवा वस्त्रे नाहीत; मला लोकांचा पुढारी बनवू नका.”
8 For Jerusalem has stumbled and Judah has fallen, because their words and their deeds are against our Father, defying his glorious presence. यरुशलेम डगमगत आहे, यहूदीया कोसळत आहे; त्यांचे बोलणे आणि कृत्ये याहवेहच्या विरोधात आहेत, त्यांच्या गौरवशाली उपस्थितीला त्यांनी विरोध केला.
9 The look on their faces testifies against them; they flaunt their sin like Sodom—they do not hide it. How terrible for them, for they have brought disaster on themselves! त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्याच विरोधात साक्ष देतात; त्यांच्या पापांचे ते सदोम नगरीप्रमाणे प्रदर्शन करतात; ते लपवित नाहीत. त्यांचा धिक्कार असो! त्यांनीच स्वतःवर आपत्ती ओढवून घेतली आहे.
10 Tell the righteous it will go well with them, for they will eat the fruit of their deeds. परंतु नीतिमानास सांगा त्यांना सुस्थिती येईल. त्यांच्या सत्कृत्यांचे त्यांना प्रतिफळ मिळेल.
11 How terrible for the wicked! It will go badly for him, for what his hands have done will be repaid to him. दुष्टांचा धिक्कार असो! अरिष्ट त्यांच्यावर येत आहे! त्यांनी केलेल्या कृत्याचा, त्यांना मोबदला मिळणार.
12 My people—children are their oppressors, and women rule over them. My people, your guides lead you astray and have swallowed up the path you should walk. तरुण माझ्या लोकांवर अत्याचार करतात, स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात. माझ्या लोकांनो, तुमचे मार्गदर्शक तुमची दिशाभूल करतात; ते तुम्हाला पथभ्रष्ट करतात.
13 Our Father takes his stand to bring his case; he rises to judge the peoples. याहवेह त्यांच्या न्यायसभेत स्थानापन्न होतात; ते लोकांचा न्याय करण्यासाठी उभे राहतात.
14 Our Father enters into judgment with the elders and officials of his people: "It is you who have devoured the vineyard; the plunder of the poor is in your houses. त्यांच्या लोकांच्या वडिलजनांच्या व पुढाऱ्यांच्या विरोधात न्याय करण्यासाठी याहवेह त्यांच्या न्यायसभेत प्रवेश करतात: “तुम्हीच माझ्या द्राक्षमळ्याला उद्ध्वस्त केले आहे; गरिबांपासून लुबाडलेली लूट तुमच्या घरांमध्ये आहे.
15 What do you mean by crushing my people and grinding the faces of the poor?" declares the Father of heaven's armies. माझ्या लोकांना चिरडण्याचे व गरिबांचे चेहरे ठेचण्याचे काय कारण होते?” प्रभू सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
16 Our Father said: "Because the daughters of Zion are proud—walking with outstretched necks and flirting eyes, mincing along with quick little steps, jingling the anklets on their feet, याहवेह म्हणतात, “सीयोनातील स्त्रिया गर्विष्ठ आहेत, त्या मान उडवीत चालतात, चंचल नेत्रकटाक्षांनी मन वेधतात, पायातल्या पैजणांचा छुमछुम आवाज करीत, कंबर मटकत छोटी छोटी पावले टाकून चालतात.
17 therefore the Sovereign Father will strike the heads of the daughters of Zion with scabs, and our Father will lay bare their foreheads." म्हणून प्रभू सीयोनी स्त्रियांच्या डोक्यांना खवडे आणणार; याहवेह त्यांचे टाळू टकले करणार.”
18 On that day the Sovereign Father will strip away their finery: the anklets, the headbands, the crescent ornaments, त्या दिवशी त्यांची सर्व आभूषणे प्रभू ओरबाडून काढतील: त्यांच्या बांगड्या, ललाटपट्टी, व चंद्रकोर हार,
19 the earrings, the bracelets, the veils, त्यांचे कानातील झुमके, कांकण आणि मुखावरण,
20 the headdresses, the ankle chains, the sashes, the perfume flasks, the charms, त्यांची शिरोवेष्टणे, त्यांचे पैंजण आणि कमरपट्टे, अत्तरदाण्या आणि ताईत,
21 the signet rings, the nose rings, अंगठ्या आणि नथण्या,
22 the festival robes, the capes, the cloaks, the purses, उत्तम पोशाख, अधोवस्त्रे, अंगरखे, आणि बटवे,
23 the hand mirrors, the fine linen garments, the turbans, and the shawls. त्यांचे आरसे, त्यांची मलमलची वस्त्रे, मुकुट व शाली.
24 Then, instead of perfume there will be a stench; instead of a sash, a rope; instead of elegantly styled hair, baldness; instead of fine robes, a wrapping of coarse cloth; branding instead of beauty. सुगंधाऐवजी त्यांच्याकडे दुर्गंध येईल; कमरपट्ट्याऐवजी एक दोरी असेल; नीट केशरचनेऐवजी टक्कल; उत्तम पोशाखाऐवजी गोणपाट; आणि सौंदर्याऐवजी व्रण त्यांच्या वाट्याला येतील.
25 Your men will fall by the sword, your warriors in the battle. तुमचे पुरुष तलवारीने पडतील, तुमचे योद्धे युद्धभूमीवर ढासाळतील,
26 Her gates will mourn and lament; stripped bare, she will sit on the ground. सीयोनच्या वेशी आक्रोश करतील आणि विलाप करतील; ती निराधार होऊन जमिनीवर बसलेली असेल.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]