Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Amos 3 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

इस्राएलविरुद्ध साक्षीदार बोलाविण्यात येतात

1इस्राएलच्या लोकांनो, हे वचन ऐका, जे याहवेह तुमच्याविरुद्ध बोलले आहेत—त्या संपूर्ण घराण्याविरुद्ध आहे ज्यांना मी इजिप्तमधून बाहेर आणले आहे:

2“पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील लोकांमधूनमी फक्त तुझीच निवड केली आहे;म्हणून तुझ्या सर्व पापांबद्दलमी तुला शिक्षा करेन.”

3दोन व्यक्ती एकमताचे झाल्यावाचूनते सोबत चालू शकतील काय?

4शिकार नसली तरसिंह गर्जना करेन काय?काही धरल्याशिवायतो त्याच्या गुहेत गुरगुरणार काय?

5अमिष नसताना पक्षीभूमीवरील सापळ्यात अडकतो काय?जर सापळ्यात काही अडकले नसेलतर ते भूमीवरून उडेल काय?

6नगरात जेव्हा रणशिंगाचा आवाज येतो,तेव्हा लोक घाबरत नाही काय?शहरात विपत्ती आली तर,ती याहवेहने घडवून आणली नाही काय?

7सार्वभौम याहवेहआपल्या सेवक संदेष्ट्यांना त्याच्या योजना प्रकट केल्याशिवायनिश्चितच काहीही करणार नाही.

8सिंहाने गर्जना केली आहे—कोण भिणार नाही?सार्वभौम याहवेहने बोलले आहेत;तर मग संदेश दिल्यावाचून कोणी राहील काय?

9अश्दोदच्या गडांनाआणि इजिप्तच्या गडांना ही घोषणा करा:“शोमरोनच्या पर्वतावर एकत्र व्हा;तिच्यामधील गोंधळआणि तिच्या लोकांवरील अत्याचाराकडे पाहा.”

10“जे योग्य ते कसे करावे हे त्यांना माहीत नाही,” याहवेह जाहीर करतात,“त्यांनी लुटलेला व चोरी केलेला मालत्यांच्या महालात कोणी साठवून ठेवला आहे.”

11यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात,“एक शत्रू जो तुमचा देश व्यापून टाकेल,तो तुमचे किल्ले कोसळून टाकेलआणि तुमचे गड लुटेल.”

12याहवेह असे म्हणतात:“जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातूनकेवळ दोन तंगड्या आणि कानाचा एक तुकडा सोडवितो,तसे शोमरोनातील इस्राएल लोकजे पलंगाच्या शीरपट्टीनेआणि बिछान्यावरील रेशमी कापडाच्या तुकड्याने सोडविले जातील.”

13“हे ऐका आणि याकोबाच्या घराण्याविरुद्ध साक्ष द्या,” असे याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतात:

14“ज्या दिवशी मी इस्राएलला तिच्या पातकाबद्दल शिक्षा करेन,त्याच दिवशी मी बेथेलमधल्या वेद्यांचा नाश करेन;वेद्यांची शिंगे कापून टाकण्यात येतीलआणि ती जमिनीवर पडतील.

15मी ग्रीष्मकालीनघरआणि उष्मकालीनघर पाडून टाकेन;हस्तिदंताने सजविलेल्या घरांचा विध्वंस होईलभवने जमीनदोस्त होतील,”असे याहवेह जाहीर करतात.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]