Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Amos 2 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

1याहवेह असे म्हणतात,“मोआबच्या तीन नव्हेतर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही.कारण त्याने एदोम राजाची हाडे जाळूनत्याची राख केली आहे.

2मी मोआबावर अग्नी पाठवेनतो करीयोथच्या किल्ल्याला भस्म करेन.युद्धाच्या आक्रोशात आणि रणशिंगाच्या आवाजात मोआबप्रचंड नाशाने खाली जाईल.

3मी तिच्या शासकाचा नाश करेनआणि त्याच्यासोबत तिच्या सर्व अधिकार्‍यांना मारून टाकेन.”असे याहवेह म्हणतात.

4याहवेह असे म्हणतात:“यहूदीयाच्या तीन नव्हेतर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मागे फिरणार नाही.कारण त्यांनी याहवेहचे नियमशास्त्र धिक्कारले आहेव त्यांचे विधी पाळले नाही.ज्या दैवतांचे अनुसरण त्यांच्या पूर्वजांनी केले होतेत्या त्यांच्या खोट्या दैवतांनी त्यांची दिशाभूल केली होती,

5म्हणून मी यहूदीयावर अग्नी पाठवेनआणि यरुशलेमचे किल्ले भस्म करेन.”

इस्राएलचा न्याय

6याहवेह असे म्हणतात,“इस्राएलला तीन नव्हेतर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही.चांदीसाठी ते एका न्यायी व्यक्तीला,आणि पायातील एका जोड्यासाठी गरजवंत व्यक्तीला विकतात.

7ते गरिबांच्या डोक्यालाभूमिवरील धुळीत पायदळी तुडवितातआणि दीनदुबळ्यांचा न्याय करीत नाही.मुलगा व पिता एकाच तरुणीकडे जाऊनमाझ्या पवित्र नामाला काळिमा लावतात.

8प्रत्येक वेदीजवळगहाण ठेवलेल्या वस्त्रांवर पडून राहतातआणि आपल्या दैवतांच्या घरातदंड म्हणून घेतलेला द्राक्षारस पितात.

9“जरी ते गंधसरूंसारखे उंचव एलावृक्षांसारखे मजबूत होते,तरी मी त्यांच्यासमोर अमोरी लोकांचा संहार केला.मी वरून त्यांचे फळव खालून त्यांचे मूळ नासविले.

10अमोर्‍यांचा देश तुम्हाला द्यावा म्हणूनमी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणलेव चाळीस वर्षे तुम्हाला रानात चालविले.

11“तुमच्या मुलांपैकी काहींना संदेष्टे म्हणूनआणि तरुणांतील काहींना नाजीर होण्याकरिता वाढवले आहे.अहो इस्राएलच्या लोकांनो, हे खरे नाही काय?”असे याहवेह जाहीर करतात.

12“पण तुम्ही नाजीरांना द्राक्षारस पिण्यासआणि संदेष्ट्यांना भविष्य न सांगण्याची आज्ञा दिली.

13“म्हणून धान्याच्या पेंढ्यांखाली गच्च भरलेली गाडी जशी दबते,तसे मी तुम्हाला दाबेन आणि तुम्ही कण्हाल.

14चपळ निसटून जाणार नाहीत,शक्तिमानाला आपले सामर्थ्य लावता येणार नाही,आणि वीराला आपला जीव वाचविता येणार नाही.

15धनुर्धार्‍याला आपल्या भूमीवर उभे राहता येणार नाही,अत्यंत वेगाने धावणारा सैनिक सुटणार नाही,आणि घोडेस्वाराला आपला जीव वाचवता येणार नाही.

16वीरांपैकी महाधैर्यवानहीत्या दिवशी वस्त्रे टाकून पळतील.”याहवेह असे जाहीर करतात.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]