Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Amos 1 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

1तकोवा येथील एक मेंढपाळ आमोसाची वचने—त्याने उज्जीयाह यहूदाहचा आणि योआश चा पुत्र यरोबोअम इस्राएलचा राजा असता, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाबद्दल जे दृष्टान्तामध्ये पाहिले ते हे.

2त्याने म्हटले:“याहवेह सीयोनातून गर्जना करतातआणि यरुशलेमातून गडगडाट करतात;मेंढपाळांची कुरणे सुकून जातात,आणि कर्मेलचा माथा कोमेजून जाईल.”

इस्राएलच्या शेजाऱ्यांचा न्याय

3याहवेह असे म्हणतात:“दिमिष्कच्या तीन नव्हेतर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही.कारण तिने गिलआदलामळणी करण्याच्या लोखंडी काट्यांनी मळले आहे,

4म्हणून मी हजाएलच्या घरावर अग्नी पाठवेनव बेन-हदादच्या किल्ल्याला भस्म करेन.

5दिमिष्कचे प्रवेशद्वार तोडून टाकेन;आणि आवेन खोर्‍यातील राजाआणि बेथ-एदेनचा राजदंड धरणाऱ्यांना मी नष्ट करेन.अरामाचे लोक कीर येथे गुलाम म्हणून जातील.”याहवेह असे म्हणतात.

6याहवेह असे म्हणतात:“गाझाच्या तीन नव्हेतर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही.कारण तिने सर्व लोकांना बंदिवासात घेतलेआणि त्यांना एदोमला विकले,

7म्हणून मी गाझाच्या तटांवर अग्नी पाठवेनआणि तिच्या किल्ल्याला भस्म करेन.

8मी अश्दोदच्या राजाचाआणि अष्कलोनचा राजदंड धरणार्‍याचा नाश करेन.शेवटच्या पलिष्टीचा नाश होत नाहीतोपर्यंत मी आपला हात एक्रोनावर चालवेन,”असे सार्वभौम याहवेह म्हणतात.

9याहवेह असे म्हणतात:“सोरच्या तीन नव्हेतर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही.कारण बंदिवासातील सर्वांना एदोमास विकलेआणि बंधुत्वाच्या कराराची अवहेलना केली आहे.

10म्हणून मी सोरच्या तटांवर अग्नी पाठवेनआणि तिच्या किल्ल्यांना भस्म करेन.”

11याहवेह असे म्हणतात:“एदोमच्या तीन नव्हेतर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून अनुताप करणार नाही.कारण त्याने तलवार घेऊन आपल्या भावाचा पाठलाग केलाआणि देशातील स्त्रियांचा वध केला,कारण त्याचा क्रोध निरंतर वाढत होता,आणि त्याच्या क्रोध अनियंत्रित वाढत गेला,

12म्हणून मी तेमानवर अग्नी पाठवेनआणि ती आग बस्राचे किल्ले भस्म करून टाकील.”

13याहवेह असे म्हणतात,“अम्मोनच्या तीन नाहीतर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही.कारण आपल्या सीमा वाढविण्यासाठीगिलआदाच्या गरोदर स्त्रियांना चिरले,

14म्हणून मी राब्बाहच्या तटांवर अग्नी पाठवेनआणि त्यामुळे त्यांचे किल्ले व राजमहाल भस्म होतील.महान वादळामध्ये वावटळीचा आवाज व्हावातसा भयानक रणगर्जना होतील;

15आणि तिचा राजाआणि राजाचे अधिपती बरोबरच बंदिवासात जातील.”याहवेहने म्हटले.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]