Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Joel 3 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

राष्ट्रांचा न्याय

1“त्या दिवसात आणि त्या समयी जेव्हा मी यहूदाह वयरुशलेम भविष्य पुनर्संचयित करेन,

2मी सर्व राष्ट्रांना एकत्र करेनआणि त्यांना खाली यहोशाफाट च्या खोऱ्यात आणेन.त्यांनी माझ्या वतनास, माझ्या इस्राएली लोकांशी जे केलेत्याबद्दल मी त्यांची परीक्षा घेईन.कारण त्यांनी माझ्या लोकांना राष्ट्रांमध्ये विखुरले आहेआणि माझ्या देशाचे विभाजन केले आहे.

3त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्ठ्या टाकल्याआणि वेश्यांसाठी मुलांचा व्यापार केला;मद्द्याकरिता आपल्या मुलींना विकले.

4“अहो सोर आणि सीदोन, पलेशेथच्या शहरांनो, आता तुमच्याजवळ माझ्याविरुद्ध काय आहे? मी जे काही केले आहे त्याची परतफेड मला करीत आहात काय? तुम्ही मजवर सूड उगविण्याचा प्रयत्न करीत आहात काय? कारण मी त्वरेने उलट प्रहार करेन आणि तुमचेच कृत्य तुमच्या माथ्यावर उलटवेन. 5तुम्ही माझे रूप आणि सोने हरण केले आहे आणि माझी सर्व मोलवान भांडारे घेऊन ती तुमच्या मंदिरात ठेवली आहेत. 6तुम्ही यहूदीयाच्या आणि यरुशलेमच्या लोकांना त्यांच्या देशापासून दूर नेण्यासाठी यावानी लोकांना विकले.

7“परंतु जिथे तुम्ही त्यास विकून पाठविले, त्या सर्व ठिकाणांहून मी त्यांना परत आणेन आणि तुम्ही जे हे सर्व केले त्याची परतफेड तुमच्या माथ्यावर फेडीन. 8मी तुमचे पुत्र व तुमच्या कन्या यहूदीयातील लोकांना विकून टाकेन आणि ते त्यांना दूरच्या शबाई लोकांस विकतील.” याहवेहने हे म्हटले आहे.

9राष्ट्रांमध्ये ही घोषणा करा:युद्धासाठी सुसज्ज व्हा!योद्ध्यांना आव्हान करा!तुमचे सर्व लढवय्ये जवळ या आणि हल्ला करा.

10तुमचा फाळ वितळवून त्यांच्या तलवारी तयार कराआणि तुमच्या कोयत्यांचे भाले बनवा.दुर्बल असे म्हणो,“मी सबल आहे!”

11सभोवतालच्या राष्ट्रांनो, तुम्ही लवकर या,आणि तिथे एकत्र व्हा.हे याहवेह, तुमचे योद्धे खाली आणा!

12“राष्ट्रे जागृत व्हावी;त्यांनी यहोशाफाटाच्या खोर्‍यात यावे,कारण तिथे मी न्यायासनावर बसूनचारही बाजूंच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे.

13आता विळा चालवा,कारण पीक तयार झाले आहे.या, द्राक्षांचा घाणा तुडवा,कारण द्राक्षकुंडे भरली आहेतआणि कुंडे ओसंडून वाहत आहेत—कारण त्यांची दुष्टाई फार मोठी आहे!”

14निर्णयाच्या खोर्‍यातलोकांची गर्दीच गर्दी आहे!कारण निर्णयाच्या खोऱ्यातयाहवेहचा दिवस येऊन ठेपला आहे.

15सूर्य व चंद्र काळे पडतीलआणि तारे यापुढे प्रकाशणार नाही.

16याहवेह सीयोनातून गर्जना करतीलआणि यरुशलेमातून गडगडाट होईल;पृथ्वी व आकाश थरथर कापतील.परंतु याहवेह त्याच्या लोकांसाठी आश्रयस्थानआणि इस्राएल लोकांसाठी दुर्ग असतील.

परमेश्वराच्या लोकांसाठी आशीर्वाद

17“तेव्हा तुम्हाला कळून येईल कीसीयोनात, माझ्या पवित्र पर्वतावर, राहणारा मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.यरुशलेम पवित्र होईल;परकीय लोक तिच्यावर पुन्हा कधीही आक्रमण करणार नाहीत.

18“त्या दिवशी नवीन द्राक्षारस पर्वतांवरून पाझरेल,आणि टेकड्यांवरून दूध वाहील;यहूदीयातील ओहोळांची कोरडी पात्रे पाण्याने भरून वाहतीलआणि याहवेहच्या मंदिरातून एक झरा निघेल व तोशिट्टीमच्या खोर्‍यात पाणी पुरवेल.

19इजिप्त देश उजाड होईलआणि एदोम देश ओसाड होईल,कारण त्यांनी यहूदीयाच्या लोकांवर अत्याचार केलात्यांच्या देशात त्यांनी निर्दोष रक्त पाडले आहे.

20परंतु यहूदाह सदासर्वकाळआणि यरुशलेम पिढ्यान् पिढ्या वसलेले राहील.

21त्यांच्या निर्दोष रक्ताचा सूड न घेता मी जाईन काय?नाही, मुळीच नाही.”याहवेह सीयोनमध्ये निवास करतात!

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]