Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Joel 3 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 "For look, in those days and at that time, when I restore the fortunes of Judah and Jerusalem, “त्या दिवसात आणि त्या समयी जेव्हा मी यहूदाह व यरुशलेम भविष्य पुनर्संचयित करेन,
2 I will gather all the nations and bring them down to the Valley of Jehoshaphat. There I will judge them on behalf of my people, my inheritance Israel, whom they scattered among the nations; for they divided up my land, मी सर्व राष्ट्रांना एकत्र करेन आणि त्यांना खाली यहोशाफाट च्या खोऱ्यात आणेन. त्यांनी माझ्या वतनास, माझ्या इस्राएली लोकांशी जे केले त्याबद्दल मी त्यांची परीक्षा घेईन. कारण त्यांनी माझ्या लोकांना राष्ट्रांमध्ये विखुरले आहे आणि माझ्या देशाचे विभाजन केले आहे.
3 and they cast lots for my people. They traded a boy for a prostitute, and sold a girl for wine to drink. त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्ठ्या टाकल्या आणि वेश्यांसाठी मुलांचा व्यापार केला; मद्द्याकरिता आपल्या मुलींना विकले.
4 "Now what do you have against me, Tyre and Sidon, and all the regions of Philistia? Are you repaying me for something I have done? If you are paying me back, I will swiftly and speedily bring what you have done back on your own heads. “अहो सोर आणि सीदोन, पलेशेथच्या शहरांनो, आता तुमच्याजवळ माझ्याविरुद्ध काय आहे? मी जे काही केले आहे त्याची परतफेड मला करीत आहात काय? तुम्ही मजवर सूड उगविण्याचा प्रयत्न करीत आहात काय? कारण मी त्वरेने उलट प्रहार करेन आणि तुमचेच कृत्य तुमच्या माथ्यावर उलटवेन.
5 For you took my silver and my gold and carried my finest treasures into your temples. तुम्ही माझे रूप आणि सोने हरण केले आहे आणि माझी सर्व मोलवान भांडारे घेऊन ती तुमच्या मंदिरात ठेवली आहेत.
6 You sold the people of Judah and Jerusalem to the Greeks, to send them far away from their own land. तुम्ही यहूदीयाच्या आणि यरुशलेमच्या लोकांना त्यांच्या देशापासून दूर नेण्यासाठी यावानी लोकांना विकले.
7 "But look, I am rousing them from the place to which you sold them, and I will bring what you have done back on your own heads. “परंतु जिथे तुम्ही त्यास विकून पाठविले, त्या सर्व ठिकाणांहून मी त्यांना परत आणेन आणि तुम्ही जे हे सर्व केले त्याची परतफेड तुमच्या माथ्यावर फेडीन.
8 I will sell your sons and daughters to the people of Judah, and they will sell them to the Sabeans, to a nation far away—for our Father has spoken." मी तुमचे पुत्र व तुमच्या कन्या यहूदीयातील लोकांना विकून टाकेन आणि ते त्यांना दूरच्या शबाई लोकांस विकतील.” याहवेहने हे म्हटले आहे.
9 Proclaim this among the nations: Prepare for war! Rouse the warriors! Let all the fighting men draw near and come up. राष्ट्रांमध्ये ही घोषणा करा: युद्धासाठी सुसज्ज व्हा! योद्ध्यांना आव्हान करा! तुमचे सर्व लढवय्ये जवळ या आणि हल्ला करा.
10 Beat your plowshares into swords and your pruning hooks into spears; let the weakling say, "I am a warrior." तुमचा फाळ वितळवून त्यांच्या तलवारी तयार करा आणि तुमच्या कोयत्यांचे भाले बनवा. दुर्बल असे म्हणो, “मी सबल आहे!”
11 Hurry and come, all you surrounding nations, and gather yourselves there. Bring down your warriors, our Father. सभोवतालच्या राष्ट्रांनो, तुम्ही लवकर या, आणि तिथे एकत्र व्हा. हे याहवेह, तुमचे योद्धे खाली आणा!
12 "Let the nations rouse themselves and come up to the Valley of Jehoshaphat; for there I will sit to judge all the surrounding nations. “राष्ट्रे जागृत व्हावी; त्यांनी यहोशाफाटाच्या खोर्‍यात यावे, कारण तिथे मी न्यायासनावर बसून चारही बाजूंच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे.
13 Swing the sickle, for the harvest is ripe. Come, trample, for the winepress is full and the vats overflow—for their wickedness is great." आता विळा चालवा, कारण पीक तयार झाले आहे. या, द्राक्षांचा घाणा तुडवा, कारण द्राक्षकुंडे भरली आहेत आणि कुंडे ओसंडून वाहत आहेत— कारण त्यांची दुष्टाई फार मोठी आहे!”
14 Multitudes, multitudes in the valley of decision! For the day of our Father is near in the valley of decision. निर्णयाच्या खोर्‍यात लोकांची गर्दीच गर्दी आहे! कारण निर्णयाच्या खोऱ्यात याहवेहचा दिवस येऊन ठेपला आहे.
15 The sun and the moon grow dark, and the stars hold back their light. सूर्य व चंद्र काळे पडतील आणि तारे यापुढे प्रकाशणार नाही.
16 Our Father roars from Zion and raises his voice from Jerusalem; the heavens and the earth tremble. But our Father is a refuge for his people, a stronghold for the children of Israel. याहवेह सीयोनातून गर्जना करतील आणि यरुशलेमातून गडगडाट होईल; पृथ्वी व आकाश थरथर कापतील. परंतु याहवेह त्याच्या लोकांसाठी आश्रयस्थान आणि इस्राएल लोकांसाठी दुर्ग असतील.
17 "Then you will know that I am your Father, living in Zion, my holy mountain. Jerusalem will be holy, and foreigners will never pass through it again. “तेव्हा तुम्हाला कळून येईल की सीयोनात, माझ्या पवित्र पर्वतावर, राहणारा मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. यरुशलेम पवित्र होईल; परकीय लोक तिच्यावर पुन्हा कधीही आक्रमण करणार नाहीत.
18 "And in that day the mountains will drip with sweet wine, the hills will flow with milk, and all the streambeds of Judah will run with water. A spring will flow from my house and water the Valley of Acacias. “त्या दिवशी नवीन द्राक्षारस पर्वतांवरून पाझरेल, आणि टेकड्यांवरून दूध वाहील; यहूदीयातील ओहोळांची कोरडी पात्रे पाण्याने भरून वाहतील आणि याहवेहच्या मंदिरातून एक झरा निघेल व तो शिट्टीमच्या खोर्‍यात पाणी पुरवेल.
19 Egypt will become a wasteland and Edom a desolate wilderness, because of the violence done to the people of Judah, in whose land they shed innocent blood. इजिप्त देश उजाड होईल आणि एदोम देश ओसाड होईल, कारण त्यांनी यहूदीयाच्या लोकांवर अत्याचार केला त्यांच्या देशात त्यांनी निर्दोष रक्त पाडले आहे.
20 But Judah will be inhabited forever, and Jerusalem through all generations. परंतु यहूदाह सदासर्वकाळ आणि यरुशलेम पिढ्यान् पिढ्या वसलेले राहील.
21 I will cleanse the guilt of the blood shed against them—which I have not yet cleansed—for our Father dwells in Zion." त्यांच्या निर्दोष रक्ताचा सूड न घेता मी जाईन काय? नाही, मुळीच नाही.” याहवेह सीयोनमध्ये निवास करतात!
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]