Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Amos 2 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 This is what our Father says: For three sins of Moab, and for four, I will not revoke it—he burned the bones of Edom's king to lime. याहवेह असे म्हणतात, “मोआबच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण त्याने एदोम राजाची हाडे जाळून त्याची राख केली आहे.
2 So I will send fire on Moab, and it will devour the strongholds of Kerioth; Moab will die amid the uproar, with shouting and the sound of the shofar. मी मोआबावर अग्नी पाठवेन तो करीयोथच्या किल्ल्याला भस्म करेन. युद्धाच्या आक्रोशात आणि रणशिंगाच्या आवाजात मोआब प्रचंड नाशाने खाली जाईल.
3 I will cut off the ruler from her midst and kill all her officials with him, says our Father. मी तिच्या शासकाचा नाश करेन आणि त्याच्यासोबत तिच्या सर्व अधिकार्‍यांना मारून टाकेन.” असे याहवेह म्हणतात.
4 This is what our Father says: For three sins of Judah, and for four, I will not revoke it—they rejected our Father's instruction and did not keep his rules, and their lies led them astray, the same lies their ancestors followed. याहवेह असे म्हणतात: “यहूदीयाच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी याहवेहचे नियमशास्त्र धिक्कारले आहे व त्यांचे विधी पाळले नाही. ज्या दैवतांचे अनुसरण त्यांच्या पूर्वजांनी केले होते त्या त्यांच्या खोट्या दैवतांनी त्यांची दिशाभूल केली होती,
5 So I will send fire on Judah, and it will devour the strongholds of Jerusalem. म्हणून मी यहूदीयावर अग्नी पाठवेन आणि यरुशलेमचे किल्ले भस्म करेन.”
6 This is what our Father says: For three sins of Israel, and four, I won't relent—they sell the righteous for silver, the needy for a pair of sandals. याहवेह असे म्हणतात, “इस्राएलला तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. चांदीसाठी ते एका न्यायी व्यक्तीला, आणि पायातील एका जोड्यासाठी गरजवंत व्यक्तीला विकतात.
7 They trample the heads of the poor into the dust of the earth and push the afflicted off the road. A man and his father go to the same girl, profaning my holy name. ते गरिबांच्या डोक्याला भूमिवरील धुळीत पायदळी तुडवितात आणि दीनदुबळ्यांचा न्याय करीत नाही. मुलगा व पिता एकाच तरुणीकडे जाऊन माझ्या पवित्र नामाला काळिमा लावतात.
8 They stretch out beside every altar on garments taken as collateral, and in the house of their God they drink the wine of those they have fined. प्रत्येक वेदीजवळ गहाण ठेवलेल्या वस्त्रांवर पडून राहतात आणि आपल्या दैवतांच्या घरात दंड म्हणून घेतलेला द्राक्षारस पितात.
9 Yet it was I who destroyed the Amorite before them, as tall as the cedars and as strong as the oaks; I destroyed his fruit above and his roots below. “जरी ते गंधसरूंसारखे उंच व एलावृक्षांसारखे मजबूत होते, तरी मी त्यांच्यासमोर अमोरी लोकांचा संहार केला. मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांचे मूळ नासविले.
10 And it was I who brought you up out of the land of Egypt and led you forty years in the wilderness, to take possession of the land of the Amorite. अमोर्‍यांचा देश तुम्हाला द्यावा म्हणून मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले व चाळीस वर्षे तुम्हाला रानात चालविले.
11 I raised up some of your sons as prophets and some of your young men as Nazirites. Is this not so, people of Israel? declares our Father. “तुमच्या मुलांपैकी काहींना संदेष्टे म्हणून आणि तरुणांतील काहींना नाजीर होण्याकरिता वाढवले आहे. अहो इस्राएलच्या लोकांनो, हे खरे नाही काय?” असे याहवेह जाहीर करतात.
12 But you made the Nazirites drink wine, and you commanded the prophets, saying, "Do not prophesy." “पण तुम्ही नाजीरांना द्राक्षारस पिण्यास आणि संदेष्ट्यांना भविष्य न सांगण्याची आज्ञा दिली.
13 Look, I will crush you in your place, as a cart full of sheaves crushes the ground beneath it. “म्हणून धान्याच्या पेंढ्यांखाली गच्च भरलेली गाडी जशी दबते, तसे मी तुम्हाला दाबेन आणि तुम्ही कण्हाल.
14 Even the swift will find no escape, the strong will not hold on to his strength, and the warrior will not save his life. चपळ निसटून जाणार नाहीत, शक्तिमानाला आपले सामर्थ्य लावता येणार नाही, आणि वीराला आपला जीव वाचविता येणार नाही.
15 The archer will not stand his ground, the fleet-footed will not escape, and the horseman will not save his life. धनुर्धार्‍याला आपल्या भूमीवर उभे राहता येणार नाही, अत्यंत वेगाने धावणारा सैनिक सुटणार नाही, आणि घोडेस्वाराला आपला जीव वाचवता येणार नाही.
16 Even the bravest of the warriors will flee away naked on that day, declares our Father. वीरांपैकी महाधैर्यवानही त्या दिवशी वस्त्रे टाकून पळतील.” याहवेह असे जाहीर करतात.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]