Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 5 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 My son, pay attention to my wisdom; listen closely to my understanding, माझ्या मुला, माझ्या सुज्ञानाकडे लक्ष दे, माझ्या अंतर्ज्ञानाच्या शब्दांकडे तुझे कान लाव;
2 so that you may guard discretion and your lips may preserve knowledge. म्हणजे विवेकबुद्धीने कसे वागावे हे तुला समजेल; आणि तुझी जीभ ज्ञानाचे रक्षण करेल.
3 For the lips of the forbidden woman drip honey, and her mouth is smoother than oil, कारण वेश्येचे बोलणे मधासारखे गोड असते, आणि तिचा संवाद तेलापेक्षा गुळगुळीत असतो;
4 but in the end she is bitter as poison, sharp as a double-edged sword. परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते, आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते.
5 Her feet go down to death; her steps take hold of the grave. तिचे पाय मृत्यूकडे जातात; तिची पावले सरळ अधोलोकी नेतात.
6 She gives no thought to the path of life; her ways wander, and she does not know it. जीवनाच्या मार्गाचा ती विचारच करीत नाही; तिचे मार्ग लक्ष्यहीनपणे भटकणारे आहेत, परंतु तिला ते माहीत नसते.
7 And now, my sons, listen to me, and do not turn away from the words of my mouth. मग माझ्या मुलांनो, आता माझे ऐका; माझ्या बोधवचनांकडे पाठ फिरवू नका.
8 Keep your way far from her, and do not go near the door of her house, तू तुझा मार्ग अशा स्त्रीपासून दूर ठेव, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस,
9 lest you give your honor to others and your years to one who is cruel, असे होऊ नये की, तू तुझा मान दुसर्‍यांना द्यावा आणि तुझी प्रतिष्ठा क्रूर मनुष्याला मिळावी,
10 lest strangers take their fill of your strength, and your hard-earned labors go to the house of a foreigner, तुझ्या संपत्तीवर अपरिचित लोक मेजवानी करू नये आणि तुझ्या परिश्रमाने दुसर्‍याचे घर समृद्ध होऊ नये.
11 and at your end you groan, when your flesh and body are consumed, तुझ्या जीवन अंती, जेव्हा तुझे मांस आणि शरीर झिजून जाईल तेव्हा तू दुःखाने विव्हळशील.
12 and you say, "How I hated discipline, and my heart despised correction! तू म्हणशील, “अरेरे! मी शिस्तीचा किती तिरस्कार केला! माझ्या अंतःकरणाने सुधारणा कशी फेटाळून लावली!
13 I did not listen to the voice of my teachers or heed my instructors. मी माझ्या शिक्षकांचे आज्ञापालन करत नसे किंवा मला मार्गदर्शन करणार्‍यांकडे मी कानाडोळा करीत असे.
14 I was at the brink of utter ruin in the midst of the assembled congregation." आणि म्हणून लवकरच मी परमेश्वराच्या लोकांच्या सभेपुढे गंभीर अडचणीत आलो.”
15 Drink water from your own cistern, flowing water from your own well. तुझ्या स्वतःच्याच टाकीतील पाणी पी. तुझ्या स्वतःच्या विहिरीतील वाहते पाणी पी.
16 Should your springs overflow in the streets, your streams of water in the public squares? तुझे पाण्याचे झरे भरून रस्त्यांवर वाहून जावेत काय, तुझे पाण्याचे प्रवाह भर चौकात वाहावेत काय?
17 Let them be yours alone, and not shared with strangers. ते फक्त तुझ्यासाठीच असावेत, अनोळख्यांबरोबर ते कधीच वाटली जाऊ नयेत.
18 May your fountain be blessed, and rejoice in the wife of your youth, तुझे पौरुषत्व आशीर्वादित होवो; आपल्या तारुण्यातील पत्नीबरोबर आनंदाचा उपभोग घे.
19 a loving doe, a graceful deer. May her love satisfy you always; may you be captivated continually by her love. प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती— तिचे स्तन तुला नेहमीच तृप्त करोत, तिच्या प्रेमाने तू नेहमी धुंद व्हावेस.
20 Why then, my son, should you be captivated by a forbidden woman and embrace another man's wife? माझ्या मुला, तू दुसर्‍या मनुष्याच्या पत्नीबरोबर धुंद का व्हावेस? आणि स्वैर स्त्रीला आलिंगन का द्यावेस?
21 For a man's ways are before the eyes of our Father, and he examines all the man's paths. कारण तुझे मार्ग याहवेहच्या दृष्टीसमोर आहेत, आणि ते तुझ्या सर्व मार्गांचे परीक्षण करतात.
22 The wicked are caught by their own wrongdoing and held fast in the cords of their sin. दुष्ट मनुष्याचा नाश स्वतःच्याच पातकांनी होतो; त्याचीच पातके दोर बनून त्याला पाशात पकडून ठेवतात.
23 He will die for lack of discipline, and he will go astray because of his great foolishness. कारण शिस्त नसल्यामुळे त्यांना मरण येईल, आणि स्वतःच्याच अतिमूर्खपणाने ते फसविले जातील.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]