Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 4 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Listen, my children, to a father's instruction; pay attention, and gain understanding. माझ्या मुलांनो, वडिलांचा बोध ऐका; त्याकडे लक्ष द्या आणि समंजसपणा मिळवा.
2 I am giving you sound teaching, so do not abandon my instruction. मी तुम्हाला उत्तम शिक्षण देतो, म्हणून माझ्या शिक्षणाचा त्याग करू नका.
3 For I too was a son to my father, tender and the only beloved of my mother. कारण मी सुद्धा माझ्या वडिलांचा पुत्र होतो, अजूनही सुकुमार आणि आईच्या प्रेमात वाढलेला.
4 He taught me and said, "Let your heart hold on to my words; keep my commands and you will live. तेव्हा त्यांनी मला शिकविले आणि ते मला म्हणाले, “तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून माझ्या वचनांकडे लक्ष लाव; माझ्या आज्ञांचे पालन कर आणि तुला आयुष्य लाभेल.
5 Get wisdom, get understanding; do not forget, and do not turn away from the words of my mouth. सुज्ञान मिळव, समंजसपणा प्राप्त कर; माझी वचने विसरू नकोस किंवा त्यांच्यापासून दूर जाऊ नकोस.
6 Do not forsake her, and she will protect you; love her, and she will watch over you. सुज्ञानाचा त्याग करू नकोस आणि ती तुझे रक्षण करेल; तिच्यावर प्रीती कर आणि ती तुझे रक्षण करेल.
7 The beginning of wisdom is this: get wisdom; and with all you acquire, get understanding. सुज्ञानाची सुरवात अशी आहे: सुज्ञान मिळव. जरी तुझ्याकडे जे आहे ते सर्व खर्च करावे लागले तरी समंजसपणा मिळव.
8 Cherish her, and she will lift you high; embrace her, and she will bring you honor. तू जर तिला उराशी जतन करशील तर ती तुला उंचावेल. ज्ञानाला दृढ आलिंगन दे मग ती तुला सन्मान देईल;
9 She will set a garland of grace on your head; she will present you with a crown of glory." ती तुझ्या मस्तकांवर फुलांचा मुकुट देईल, आणि एक सुशोभित मुकुट तुला सादर करेल.”
10 Listen, my son, and receive my words, and the years of your life will be many. माझ्या मुला ऐक, मी काय म्हणतो ते स्वीकार, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील.
11 I have taught you the way of wisdom; I have led you along straight paths. मी तुला सुज्ञान मार्गाचे शिक्षण देतो, आणि तुला सरळ वाटेने चालवितो.
12 When you walk, your steps will not be held back; and when you run, you will not stumble. जेव्हा तू चालशील तेव्हा तुझी पावले लटपटणार नाहीत; जेव्हा तू धावशील, तू अडखळणार नाहीस.
13 Hold on to instruction, do not let go; guard her, for she is your life. बोधवचने अंमलात आण, ती सोडून देऊ नकोस; त्यांचे चांगले रक्षण कर, कारण त्यातच तुझे जीवन आहे.
14 Do not set foot on the path of the wicked, and do not walk in the way of evildoers. दुष्ट लोकांच्या मार्गात पाऊल टाकू नकोस, किंवा दुष्कृत्ये करणार्‍यांच्या मार्गाने जाऊ नकोस.
15 Avoid it, do not travel on it; turn away from it and pass on by. त्याकडे पाठ फिरव, त्यावर प्रवास करू नकोस, त्यांच्यापासून मागे वळ आणि तुझ्या मार्गाने जा,
16 For they cannot sleep unless they do wrong; they are robbed of rest unless they make someone stumble. कारण दुष्कर्म केल्याशिवाय ते स्वस्थ राहू शकत नाहीत; कोणाला तरी अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप येत नाही.
17 They feed on the bread of wickedness and drink the wine of violence. दुष्टाईने मिळविलेली भाकर ते खातात, आणि हिंसाचाराचा द्राक्षारस ते पितात.
18 But the path of the righteous is like the light of dawn, shining brighter and brighter until the full light of day. नीतिमान मनुष्याचा मार्ग सकाळच्या सूर्याप्रमाणे आहे, दुपारपर्यंत अधिकच तेजस्वी होणाऱ्या प्रकाशाप्रमाणे तो आहे.
19 The way of the wicked is like deep darkness; they do not know what makes them stumble. दुर्जनाचा मार्ग गडद अंधकाराप्रमाणे आहे; त्यांना काय अडखळविते हे त्यांना कळत नाही.
20 My son, pay attention to my words; listen closely to my sayings. माझ्या मुला, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे; माझ्या शब्दांकडे तुझे कान लाव.
21 Never lose sight of them; keep them deep within your heart. त्यांना तुझ्या दृष्टीपासून दूर जाऊ देऊ नकोस; त्यांना तुझ्या अंतःकरणात ठेव;
22 For they are life to those who find them, and healing to their whole body. कारण ज्यांना ते मिळतात, त्यांच्यासाठी ते जीवन आहेत. आणि ते त्यांच्या संपूर्ण शरीराला आरोग्य देतात.
23 Above all else, guard your heart, for everything you do flows from it. सर्वापेक्षा अधिक तुझ्या हृदयाचे रक्षण कर, कारण जे सर्वकाही तू करतो, ते त्यापासून निष्पन्न होते.
24 Keep crooked speech from your mouth, and keep deceitful lips far from you. सर्वप्रकारच्या विकृती तुझ्या मुखापासून दूर ठेव; अपभ्रष्ट भाषण तुझ्या ओठांपासून दूर असू दे.
25 Let your eyes look straight ahead; fix your gaze directly before you. तुझ्या डोळ्यांनी तू समोरच पाहा; तुझी नजर एकटक सरळ बघेल असे लक्ष ठेव.
26 Give careful thought to the path for your feet, and all your ways will be secure. तुझ्या पावलांसाठी असलेल्या मार्गाचा काळजीपूर्वक विचार कर, आणि तुझ्या सर्व मार्गामध्ये तू स्थिर राहा.
27 Do not turn to the right or the left; keep your foot away from evil. उजवीकडे किंवा डावीकडे वळू नकोस; वाईटाकडे जाण्यापासून तुझी पावले दूर ठेव.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]