Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 31 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 The words of King Lemuel—an oracle his mother taught him: राजा लमुवेलची ही नीतिसूत्रे—त्याच्या आईने प्रेरणेने शिकविलेली ही वचने आहेत.
2 What, my son? What, son of my womb? What, son of my vows? माझ्या मुला ऐक! माझ्या पोटच्या मुला ऐक! माझ्या प्रार्थनांचे मिळालेले उत्तर, अशा माझ्या मुला ऐक!
3 Do not give your strength to women, or your ways to those who destroy kings. तुझी शक्ती स्त्रियांच्या सहवासात घालवू नको. जे राजांचा नाश करतात, त्यांच्यासाठी तुझे बळ घालवू नको.
4 It is not for kings, Lemuel—not for kings to drink wine, or for rulers to crave strong drink. हे लमुवेला, राजांसाठी हे अयोग्य आहे— मद्य पिणे हे राजांसाठी योग्य नाही किंवा मदिरेची इच्छा बाळगणे हे राजांना शोभत नाही.
5 For if they drink, they will forget what is decreed and pervert the rights of all the oppressed. असे होऊ नये की, त्यांनी मद्य प्राशन करावे आणि त्यांना दिलेला हुकूमनामा विसरून जावे, आणि सर्व जाचलेल्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करावे.
6 Give strong drink to one who is perishing, and wine to those in bitter distress. ज्यांचा नाश होत आहे त्यांना मदिरा पिऊ द्या, जे यातनेमध्ये आहेत त्यांना मद्य पिऊ द्या!
7 Let them drink and forget their poverty, and remember their misery no more. त्यांना पिऊ द्या आणि त्यांचे दारिद्र्य विसरू द्या, आणि त्यांच्या क्लेशाचे विस्मरण होऊ द्या.
8 Open your mouth for the voiceless, for the rights of all who are left destitute. जे स्वतःसाठी बोलण्यास असमर्थ आहेत, त्यांच्यातर्फे बोल, जे सर्व निराश्रित आहेत त्यांच्या हक्कासाठी तू बोल.
9 Open your mouth, judge righteously, and defend the rights of the poor and needy. गोरगरीब आणि गरजवंत यांचा कैवार घे; त्यांच्यासाठी बोल आणि त्यांना निष्पक्ष न्याय मिळवून दे.
10 A woman of valor—who can find her? She is far more precious than jewels. सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल? तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे.
11 The heart of her husband trusts in her, and he will lack nothing of value. तिचा पती तिच्यावर पूर्ण भरवसा ठेवतो, आणि त्याला कोणत्याही मोलवान वस्तूची उणीव पडत नाही.
12 She does him good and not harm, all the days of her life. आयुष्यभर ती त्याच्या हितासाठी झटते, त्याचे अहित करीत नाही.
13 She seeks out wool and flax, and works with willing hands. ती लोकर व ताग मिळविते आणि कामात गर्क राहून ते पिंजते.
14 She is like the merchant ships, bringing her food from afar. ती एका व्यापारी जहाजासारखी आहे, तिची भोजनसामुग्री ती फार लांब जाऊन आणते.
15 She rises while it is still night, provides food for her household, and portions for her servant girls. ती रात्र सरताच उठते; आणि तिच्या कुटुंबीयांच्या भोजनाचा प्रबंध करते आणि दासींना त्यांचा वाटा पुरविते.
16 She considers a field and buys it; from the fruit of her hands she plants a vineyard. ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते; तिच्या मिळकतीमधून ती द्राक्षमळा लावते.
17 She wraps herself in strength and makes her arms strong. ती उत्साही व कष्टाळू आहे. कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत.
18 She perceives that her trading is profitable; her lamp does not go out at night. तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते, आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही.
19 She puts her hands to the spinning staff, and her hands grasp the spindle. ती तिच्या हातांमध्‍ये चाती धरते, आणि ती बोटांनी चरकी चालविते.
20 She opens her hand to the poor and reaches out her hands to the needy. ती गरिबांना उदारहस्ते देते आणि गरजूंना सढळ हाताने देते.
21 She has no fear for her household when it snows, for all her household are clothed in scarlet. हिवाळा येतो तेव्हा तिला तिच्या कुटुंबाची चिंता करीत नसते; कारण ते सर्वजण किरमिजी वस्त्र घातलेले असतात.
22 She makes coverings for herself; her clothing is fine linen and purple. ती तिचा पलंग सजविण्यासाठी चादरी विणते; ती रेशमी तागाचा आणि जांभळा पोशाख घालते.
23 Her husband is known in the gates, when he sits among the elders of the land. तिच्या पतीला नगराच्या वेशीत सन्मान मिळतो, जिथे तो देशातील पुढार्‍यांबरोबर बसतो.
24 She makes linen garments and sells them, and supplies sashes to the merchants. ती तागाची वस्त्रे करून विकते आणि व्यापार्‍यांना कमरबंद पुरविते.
25 Strength and dignity are her clothing, and she laughs at the days to come. बल व प्रताप तिची वस्त्रे आहेत. भविष्याबद्दल विचार करून ती आनंदी होते.
26 She opens her mouth with wisdom, and faithful instruction is on her tongue. तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत. तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते.
27 She watches over the ways of her household and does not eat the bread of idleness. घरातील प्रत्येक गोष्टींवर तिचे बारकाईने लक्ष असते; आळसाने मिळवलेली भाकर ती कधीही खात नाही.
28 Her children rise up and call her blessed; her husband also, and he praises her: तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात; आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो:
29 "Many daughters have done valiantly, but you surpass them all." “उत्कृष्ट कार्य करणार्‍या अनेक स्त्रिया आहेत, पण त्या सर्वात तू उत्तम आहेस.”
30 Charm is deceptive and beauty is fleeting, but a woman who reveres our Father—she will be praised. मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते, परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते.
31 Give her the fruit of her hands, and let her works praise her in the gates. तिने केलेल्या सर्व कृत्यांसाठी तिचा सन्मान कर, आणि तिच्या कार्याबद्दल शहराच्या वेशीजवळ तिची प्रशंसा केली जावो.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]