Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 30 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 The words of Agur son of Jakeh—the oracle. The man declares: I am weary, O my Father; I am weary, O my Father, and worn out. मस्सा याकेहाचा पुत्र आगूराची आत्मप्रेरित वचने. या मनुष्याने इथिएल व उकाल यांना उद्देशून असे बोलले आहे: “परमेश्वरा, मी थकलो आहे, तरीही मी जिंकू शकतो.
2 Surely I am too brutish to be a man; I do not have the understanding of a man. मी फक्त पशुतुल्य आहे, मनुष्य नाही; मला मानवी समज नाही.
3 I have not learned wisdom, nor do I have knowledge of the Holy One. मी सुज्ञता शिकलो नाही, तसेच मला पवित्र परमेश्वराचे ज्ञानही नाही.
4 Who has ascended to heaven and come down? Who has gathered the wind in the hollow of his hands? Who has wrapped the waters in a garment? Who has established all the ends of the earth? What is his name, and what is his son's name? Surely you know! वर स्वर्गात कोण चढून गेला आणि मग खाली उतरला आहे? वार्‍याला मुठीमध्ये धरलेला असा कोण आहे? अंगरख्यामध्ये कोणी पाणी बांधले आहे काय? पृथ्वीच्या सर्व सीमांची स्थापना कोणी केली आहे? त्याचे नाव काय आहे आणि त्याच्या पुत्राचे नाव काय आहे? तुम्हाला ते निश्चितच माहीत आहे!
5 Every word of our Father proves true; he is a shield to those who take refuge in him. “परमेश्वराचा प्रत्येक शब्द दोषरहित आहे; जे त्यांच्याकडे आश्रय घेतात, त्यांची ते ढाल आहेत.
6 Do not add to his words, or he will rebuke you and prove you a liar. त्यांच्या वचनात भर घालू नका. नाहीतर ते तुम्हाला रागावतील आणि तुम्ही लबाड आहात हे सिद्ध होईल.
7 Two things I ask of you; do not withhold them from me before I die: “हे याहवेह, मी दोन कृपादानांची याचना करतो; माझ्या मरणापूर्वी मला नकार देऊ नका:
8 Keep falsehood and lies far from me; give me neither poverty nor riches; feed me only the bread that is my portion, कपटी वागणे आणि असत्य बोलणे यापासून मला दूर ठेवा; मला दारिद्र्य किंवा श्रीमंतीही देऊ नका; परंतु फक्त माझी रोजची भाकर मला द्या.
9 for if I am full, I may deny you and say, "Who is God?" or if I am poor, I may steal and profane the name of my God. कारण असे होऊ नये, कि मी श्रीमंत झालो तर तुम्हाला विसरेन आणि म्हणेन, ‘याहवेह कोण आहे?’ किंवा दरिद्री झालो तर कदाचित मी चोरी करेन आणि माझ्या परमेश्वराच्या नावाची निंदा होईल.”
10 Do not slander a servant to his master, or he will curse you and you will be found guilty. दासाविरुद्ध त्याच्या धन्याकडे निंदानालस्ती करू नका; असे केल्यास तो तुम्हाला शाप देईल आणि तुम्ही दोषी ठराल.
11 There is a generation that curses its father and does not bless its mother. असे काही लोक आहेत जे त्यांच्या वडिलांना शाप देतात, आणि त्यांच्या मातांनाही धन्यता देत नाहीत.
12 There is a generation clean in its own eyes yet not washed of its filth. जे लोक आपल्या दृष्टीने स्वतःला शुद्ध समजतात, तरीपण त्यांची मलिनता त्यांनी स्वच्छ केलेली नसते;
13 There is a generation—how proud its eyes, how scornful its glances! काही लोकांचे डोळे नेहमीच मग्रुरीत असतात, ज्यांच्या नजरा तिरस्काराने भरलेल्या असतात;
14 There is a generation whose teeth are swords, whose fangs are knives, to devour the poor from the earth and the needy from among mankind. पृथ्वीवरील गरिबांना आणि मानवजातीतील गरजूंना गिळंकृत करण्यासाठी, त्यांचे दात करवतीसारखे आहेत, आणि ज्यांच्या जबड्यामध्ये चाकू ठेवलेले आहेत.
15 The leech has two daughters: "Give" and "Give." Three things are never satisfied; four never say, "Enough": “जळूला दोन मुली आहेत. ‘दे! दे!’ असे त्या ओरडतात. “अशा तीन गोष्टी आहेत त्या कधीही समाधानी नसतात, ‘पुरे झाले!’ असे कधीही न बोलणार्‍या चार गोष्टी आहेत:
16 The grave, the barren womb, the land never satisfied with water, and the fire that never says, "Enough." अधोलोक आणि वांझ गर्भाशय; भूमी, जिचे पाण्याने कधीही समाधान होत नाही, अग्नी, जो कधीही म्हणत नाही, ‘पुरे झाले!’
17 The eye that mocks a father and scorns to obey a mother—the ravens of the valley will pluck it out, and the young vultures will eat it. “आपल्या वडिलांचा चेष्टा करणारे डोळे, आणि वृद्ध आईचा तिरस्कार करणारे डोळे, दरीतील डोमकावळे टोची मारून बाहेर काढतील, त्यांची शरीरे गिधाडे खातील.
18 Three things are too wonderful for me; four I do not understand: “मला फारच आश्चर्यचकित करणार्‍या तीन गोष्टी आहेत. चार गोष्टी मला समजत नाहीत:
19 the way of an eagle in the sky, the way of a serpent on a rock, the way of a ship in the heart of the sea, and the way of a man with a young woman. गरुडाचा आकाशातील मार्ग, खडकावरून सरपटणारा साप, खवळलेल्या समुद्रात तरंगणारे जहाज, पुरुषाचा तरुणीशी संबंध?
20 This is the way of an adulteress: she eats and wipes her mouth and says, "I have done no wrong." “व्यभिचारी स्त्रीचा मार्ग असा आहे: ती खाऊन तोंड पुसते, आणि म्हणते, ‘मी काहीच वाईट केले नाही.’
21 Under three things the earth trembles; under four it cannot bear up: “तीन गोष्टीमुळे पृथ्वी हादरते, चार गोष्टी ती सहन करू शकत नाही:
22 a servant when he becomes king, and a fool when he is filled with food; एक नोकर जो राजा होतो, देवहीन मूर्ख ज्याला भरपूर खाण्यास मिळते,
23 an unloved woman when she finally marries, and a servant girl when she displaces her mistress. तिरस्करणीय स्त्री जी विवाहबद्ध होते, आणि एक मोलकरीण तिच्या मालकिणीची जागा घेते.
24 Four things on earth are small, yet they are exceedingly wise: “पृथ्वीवर चार लहान जीव आहेत, तरी त्या अत्यंत बुद्धिमान आहेत:
25 the ants are a people not strong, yet they store up their food in the summer; मुंग्या, दुर्बल प्राणी आहेत, तरीही उन्हाळ्यात ते त्यांचे धान्य साठवून ठेवतात;
26 the rock badgers are a people not mighty, yet they make their homes in the cliffs; खडकातील ससे अगदी नाजूक प्राणी! तरी ते खडकात स्वतःचे घर बनवतात;
27 the locusts have no king, yet all of them advance in ranks; टोळांना त्यांचा राजा नसतो, तरी ते टोळीटोळीने एकत्र पुढे चाल करतात;
28 the lizard you can catch in your hands, yet it is found in kings' palaces. पाल, त्यांना हाताने पकडणे शक्य आहे, तरीपण त्या राजांच्या महालात सापडतात.
29 Three things are stately in their stride; four are stately in their walk: “तीन गोष्टी आहेत, ज्यांची चाल अत्यंत डौलदार असते, चार प्राणी ज्यांची हालचाल डौलदार असते:
30 the lion, mightiest among beasts, which turns back before nothing; सिंह, सर्व प्राण्यात सामर्थ्यशाली, तो कोणाही समोर मागे सरत नाही;
31 the strutting rooster, the male goat, and a king whose army is with him. तोऱ्यात चालणारा एक कोंबडा, बोकड, आणि बंडखोरीविरुद्ध सुरक्षित असलेला राजा.
32 If you have been foolish, exalting yourself, or if you have schemed evil, put your hand over your mouth. “जर तू आत्मप्रशंसेने फुगून मूर्खपणा केला असशील किंवा दुष्ट योजना आखली असशील, तर हातांनी आपले तोंड झाकून घे.
33 For pressing milk produces curds, pressing the nose produces blood, and pressing anger produces strife. कारण जसे साय घुसळल्याने लोणी मिळते, व नाक पिळण्याने रक्त निघते, तसेच क्रोध भडकविल्याने कलह उत्पन्न होतात.”
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]