Side by side with the Father's Heart Bible™ दावीदाचे स्तोत्र.
1अहो दिव्यदूतांनो,याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.
2याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या;पवित्रतेच्या वैभवाने याहवेहची उपासना करा.
3याहवेहची वाणी जलांवर आहे;गौरवशाली याहवेहची वाणीमहा जलाशयांवर गर्जत आहे.
4याहवेहची वाणी प्रतापशाली आहे;प्रभावी आहे याहवेहचा स्वर.
5याहवेहच्या गर्जनेने देवदारू वृक्ष मोडून पडतात;लबानोनमधील देवदारू वृक्ष दुभंगतात.
6लबानोनचा डोंगर वासराप्रमाणेआणि सिर्योन तरुण रानबैलाप्रमाणे बागडतो;
7याहवेहचा आवाज कडाडतो,विजा चमकल्यासारखा.
8याहवेहच्या आवाजाचा गडगडाट वाळवंटे ढवळून काढतात;कादेशचे अरण्य याहवेह कंपित करतात.
9याहवेहच्या आवाजाने हरिणी प्रसवतातआणि वने पर्णहीन होतात.आणि त्यांच्या मंदिरात सर्वजण म्हणतात: “याहवेहचा, महिमा असो.”
10याहवेह जलप्रलयावर सिंहासनावर आरूढ झालेले आहेत;याहवेहच महाराज बनून सिंहासनावर सर्वकाळ स्थानबद्ध झालेले आहेत.
11याहवेह आपल्या लोकांना सामर्थ्य देतात;याहवेह आपल्या लोकांना शांती देऊन आशीर्वादित करतात.