Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 27 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

दावीदाचे स्तोत्र.

1याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत—मी कोणाचे भय बाळगू?याहवेह माझ्या जीवनाचे दुर्ग आहेत—मला कोणाचे भय आहे?

2जेव्हा वाईट लोक मला गिळण्यासमाझ्यावर हल्ला करतील,तेव्हा माझे शत्रू व माझे विरोधकचअडखळतील आणि पडतील.

3जरी सैन्याने मजभोवती वेढा घातला,तरी माझे अंतःकरण भयभीत होणार नाही;माझ्याविरुद्ध युद्ध जरी पेटले,तरी मी निश्चिंत राहीन.

4मी याहवेहला एक याचना केली,हीच माझी आकांक्षा आहे:मी आयुष्यभर याहवेहच्याभवनात वस्ती करावी जेणेकरूनमी याहवेहचे सौंदर्य बघून त्यांच्यामंदिरात ध्यान करावे.

5कारण संकटाच्या दिवसातते मला त्यांच्या वसतिस्थानात सुरक्षित ठेवतील;तेच मला आपल्या निवासमंडपात लपवून ठेवतील;उंच खडकावर मला सुरक्षा देतील.

6माझ्या सभोवती असणार्‍याशत्रूंसमोर माझे मस्तक उंच करतील.मी त्यांच्या पवित्र मंडपात हर्षगर्जना करून यज्ञ अर्पण करेन;मी गायन व संगीताने माझ्या याहवेहची स्तुती करेन.

7याहवेह, माझी याचना ऐका;माझ्यावर दया करा आणि मला उत्तर द्या.

8तुमच्याविषयी माझे अंतःकरण म्हणाले, “त्यांचे मुख शोध!”हे याहवेह, मी तुमचे मुख शोधेन.

9तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका,तुमच्या दासाला रागाने दूर लोटू नका;तुम्हीच माझे सहायक राहिले आहात;हे माझ्या तारणकर्त्या परमेश्वरा,मला नाकारू नका वा माझा त्याग करू नका.

10माझ्या आईवडिलांनी माझा त्याग केला.तरी याहवेह, माझा स्वीकार कराल.

11याहवेह, मला तुमचे मार्ग शिकवा;माझी छळणूक करणाऱ्यांमुळेमला सरळ मार्गावर घेऊन चला.

12मला माझ्या शत्रूंच्या तावडीत सापडू देऊ नका,कारण खोटी साक्ष देणारे आणि क्रूरपणाने फुत्कारणारेमाझ्याविरुद्ध उठले आहेत.

13मला हा पूर्णपणे विश्वास आहे:की मी या जीवनातच याहवेहच्याचांगुलपणाचा अनुभव घेणार.

14याहवेहची प्रतीक्षा कर;हिंमत बांध, धैर्य धर;आणि याहवेहचीच प्रतीक्षा कर.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]