Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 25 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 These also are proverbs of Solomon, which the men of Hezekiah king of Judah copied out. यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या सहकार्‍यांनी संग्रहित केलेली, शलोमोन राजाची ही आणखी काही नीतिवचने आहेत:
2 It is the glory of our Father to conceal a matter, but the glory of kings to search a matter out. रहस्य गुप्त ठेवणे हे परमेश्वराचे गौरव आहे; आणि गुप्त गोष्टींचा शोध लावणे हे राजाचे गौरव आहे.
3 As the heavens are high and the earth is deep, so the heart of kings is unsearchable. जसे आकाशाची उंची आणि पृथ्वीची खोली, तसेच राजांच्या मनाचाही थांग लागत नाही.
4 Take away the dross from the silver, and a vessel comes forth for the refiner. चांदीतील मळ काढला म्हणजे रौप्यकार पात्र तयार करू शकतो;
5 Take away the wicked from before the king, and his throne will be established in righteousness. राजाच्या दरबारातील भ्रष्ट अधिकारी काढून टाका आणि मग त्याचे राज्य न्यायीपणामुळे स्थिर राहील.
6 Do not put yourself forward in the king's presence, and do not stand in the place of the great; राजाच्या समक्षतेत प्रौढी मिरवू करू नकोस, आणि त्याच्या प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये स्थान ग्रहण करण्याचा दावा करू नकोस;
7 for it is better to be told, "Come up here," than to be put in a lower place in front of a noble you can see. त्याच्या प्रतिष्ठित लोकांसमोर त्याने तुझा अपमान करावा, यापेक्षा “इकडे वर ये” असे तुला बोलणे अधिक रास्त वाटेल. तुझ्या डोळ्यांनी जे काही पाहिले आहे
8 Do not rush into a quarrel, for what will you do in the end when your neighbor puts you to shame? ते न्यायालयात नेण्याची घाई करू नकोस, कारण जर तुझा शेजारी तुला फजीत करेल, तर शेवटी तू काय करशील?
9 Argue your case with your neighbor himself, but do not disclose another's secret, जर तू तुझ्या शेजार्‍याला न्यायालयात घेऊन जातोस तर, दुसर्‍याच्या विश्वासाला धोका देऊ नकोस,
10 lest the one who hears it shame you, and your bad reputation never goes away. नाहीतर तो ऐकणारा तुला निर्लज्ज ठरवेल आणि तुझ्याविरुद्ध तो दावा दाखल करेल.
11 A word spoken at the right moment is like apples of gold in settings of silver. योग्य वेळेवर दिलेला सल्ला हा चांदीच्या करंड्यात ठेवलेल्या सोन्याच्या सफरचंदासारखा आहे.
12 Like a ring of gold or an ornament of fine gold is wise correction to a listening ear. न्यायाधीशाने केलेली कान उघाडणी, ऐकणार्‍या कानासाठी सुज्ञ म्हणजे सोन्याचे कर्णफूल किंवा उत्तम सोन्याचा दागिना यासारखी आहे.
13 Like the cold of snow in the time of harvest is a faithful messenger to those who send him; he refreshes the soul of his masters. ज्याने विश्वासू सेवकाला पाठविले त्याच्यासाठी तो उन्हाळ्यातील शीतल पेयासारखा आहे; तो त्याच्या मालकाला ताजेतवाने करतो.
14 Like clouds and wind without rain is one who boasts of a gift never given. कधीही न दिलेल्या देणगीबद्दल जो घमेंड करतो, तो वृष्टिहीन मेघ आणि वारा यासारखा आहे.
15 By patience a ruler is persuaded, and a soft tongue breaks bone. सहनशीलते द्वारे शासकाचे मन वळविता येते, कारण मृदू जिव्हा हाडे मोडू शकते.
16 If you find honey, eat only enough, or you will have too much and vomit. तुम्हाला मध मिळाला तर, पुरेसाच खा— जास्त मध खाल्ल्यास तुम्ही ओकारी कराल.
17 Don't visit your neighbor's house too often, or he will grow weary of you and hate you. तुझ्या शेजार्‍यांकडे पाय क्वचितच टाक— अतिपरिचय केल्यास शेजारी तुझा द्वेष करतील.
18 Like a club, a sword, and a sharp arrow is one who bears false witness against his neighbor. शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देणे म्हणजे, जाड काठीने किंवा तलवारीने मारणे किंवा तीक्ष्ण बाण सोडणे यासारखे आहे.
19 Like a bad tooth or a foot out of joint is trust in a faithless person in time of trouble. संकटसमयी बेभरवशाच्या माणसावर विश्वास ठेवणे म्हणजे तुटक्या दातांनी चावणे किंवा मोडक्या पायांनी पळण्यासारखे आहे.
20 Like one who takes off a garment on a cold day, like vinegar poured on baking soda, is the one who sings songs to a heavy heart. ज्याचे अंतःकरण दुःखाने भरले आहे, त्याच्यासाठी हर्षगीत गाणे, एखाद्याचे पांघरूण थंडीच्या दिवसात काढून घेणे, किंवा जखमेवर शिरका ओतणार्‍यासारखे आहे.
21 If your enemy is hungry, give him bread to eat, and if he is thirsty, give him water to drink; तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला खावयास द्या; तो तान्हेला असेल तर त्याला प्यावयास पाणी दे.
22 for you will heap coals of fire on his head, and our Father will reward you. असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्‍यांची रास कराल, आणि याहवेह तुम्हाला त्याचे प्रतिफळ देतील.
23 The north wind brings forth rain, and a secretive tongue, angry looks. जसा उत्तरेकडील वारा अनपेक्षितपणे पाऊस आणतो तसेच कावेबाज जीभ—क्रोधित मुद्रेला चेतावणी देते.
24 It is better to live in a corner of the rooftop than in a shared house with a quarrelsome wife. भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्‍यात राहणे बरे.
25 Like cold water to a weary soul is good news from a distant land. दूरवरून आलेला शुभ संदेश तान्हेल्याला मिळालेल्या शीतल जलासारखा आहे.
26 Like a muddied spring or a polluted fountain is a righteous person who gives way before the wicked. नीतिमान मनुष्याने दुष्टासमोर माघार घेणे, हे पाण्याचा झरा दूषित होणे किंवा जलकुंड गढूळ होण्यासारखे आहे.
27 It is not good to eat too much honey, nor to seek your own glory. जसे अति मध खाणे हानिकारक आहे आणि अति खोल गोष्टींचा शोध घेणे सन्माननीय नसते.
28 Like a city broken into and left without walls is a person who has no control over his own spirit. स्वतःवर ताबा नसलेला मनुष्य तटबंदी ढासळलेल्या नगरासारखा आहे.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]