Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 24 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Do not envy evil men, and do not desire to be with them, दुर्जनांचा मत्सर करू नका, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नका;
2 for their hearts plot violence, and their lips speak of trouble. कारण त्यांचे अंतःकरण हिंसाचार करण्याच्या योजना करतात, आणि त्यांचे ओठ भांडण लावण्याविषयी बोलतात.
3 By wisdom a house is built, and by understanding it is established; सुज्ञानाद्वारे घर बांधले जाते, आणि समंजसपणामुळे ते स्थिर राहते;
4 and by knowledge its rooms are filled with all precious and pleasant riches. ज्ञानाद्वारे त्याच्या खोल्या दुर्मिळ आणि सुंदर अशा मौल्यवान वस्तूंनी भरलेल्या असतात.
5 A wise man is full of strength, and a man of knowledge increases his power, सुज्ञ, बलिष्ठ माणसापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे; आणि सुज्ञ आपली शक्ती वृद्धिंगत करतात.
6 for by wise guidance you can wage your war, and victory comes through many counselors. लढाईवर जाण्यासाठी निश्चितच तज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते, कारण अनेक सल्लागारांद्वारे विजय प्राप्त होते.
7 Wisdom is too high for a fool; at the gate, he has nothing to say. सुज्ञता मूर्खांच्या आवाक्याबाहेर असते; वेशीतील सभेत त्यांनी आपले तोंड उघडू नये.
8 Whoever plans to do evil will be called a schemer. जे कोणी वाईट योजना करतात ते कारस्थान करणारे म्हणून ओळखले जातील.
9 A fool's scheming is sin, and the scoffer is detestable to people. मूर्खाच्या योजना म्हणजे पाप, आणि लोक टवाळखोर मनुष्याचा द्वेष करतात.
10 If you falter in a time of trouble, your strength is small. जर कठीण परिस्थितीत तुम्ही खचून गेलात, तर तुमची शक्ती किती थोडी आहे!
11 Rescue those being taken away to death, and hold back those stumbling toward the slaughter. ज्यांना अन्यायाने मृत्युदंड दिला आहे, अशांची सुटका करा; जे लटपटणार्‍या पायांनी वध होण्यासाठी जात आहेत, त्यांना थांबव.
12 If you say, "Look, we did not know this," does not he who weighs the heart perceive it? Does not he who watches over your soul know it? And will he not repay each person according to his deeds? जर तुम्ही असे म्हणाल, “यासंबंधी आम्हाला काहीही माहीत नव्हते,” तर त्यांच्या लक्षात येणार नाही का जे सर्वांची अंतःकरणे तोलून पाहतात? जे तुझ्या जीवनाची रक्षा करतात त्यांना हे माहीत नाही का? ते प्रत्येक मनुष्याला त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देणार नाहीत का?
13 My son, eat honey, for it is good, and the honeycomb's drippings are sweet to your taste. माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे; आणि पोळ्यातून पाझरणारे मध तुझ्या जिभेला गोड लागेल.
14 Know that wisdom is just like this to your soul; if you find it, there is a future, and your hope will not be cut off. त्याचप्रमाणे सुज्ञता तुझ्यासाठी मधासारखी आहे हे लक्षात घे: जर तुला ती मिळाली तर त्यातच तुझ्या भविष्याची आशा आहे, आणि तुझी आशा कधीही तुटणार नाही.
15 Do not lie in wait, you wicked man, against the home of the righteous; do not destroy his resting place, चोरासारखा नीतिमान माणसाच्या घराजवळ लपून बसू नकोस, त्यांच्या राहत्या घराची लूट करू नको;
16 for though the righteous falls seven times, he rises again, but the wicked stumble in disaster. कारण नीतिमान जरी सात वेळा पडतात, तरी ते पुन्हा सावरतात, परंतु जेव्हा दुष्ट लोकांवर अरिष्ट कोसळते, ते नाश पावतात.
17 Do not rejoice when your enemy falls, and do not let your heart be glad when he stumbles, जेव्हा तुझा शत्रू पडतो तेव्हा आनंद करू नकोस; जेव्हा ते अडखळतात तेव्हा तुझे मन आनंदित होऊ नये,
18 lest our Father see it and be displeased, and turn his anger away from him. नाहीतर याहवेह ते पाहतील आणि अमान्य करतील आणि त्यांच्या क्रोधापासून त्यांना दूर करतील.
19 Do not fret because of evildoers, and do not envy the wicked, वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांवर संतापू नका. किंवा दुष्ट लोकांचा हेवा करू नका,
20 for the evil man has no future; the lamp of the wicked will be snuffed out. कारण दुष्ट माणसांना भावी आशा नसते; आणि दुष्ट लोकांची ज्योत मालवली जाईल.
21 My son, fear our Father and the king, and do not join with those who rebel against them, माझ्या मुला, याहवेहचे आणि राजाचे भय धर आणि बंडखोर अधिकार्‍यांना सहभागी होऊ नकोस,
22 for their disaster will rise suddenly, and who knows the ruin that both of them can bring? कारण तेच दोघे त्यांच्यावर अकस्मात नाश पाठवतील, आणि कोणते संकट ते आणू शकतात हे कोणाला माहीत आहे?
23 These also are sayings of the wise: Showing partiality in judgment is not good. ही सुद्धा सुज्ञ माणसांची वचने आहेत: न्यायदान करताना पक्षपात दाखविणे हे चांगले नाहीच:
24 Whoever says to the guilty, "You are innocent," peoples will curse him and nations will denounce him, जो कोणी दुष्टाला “तू निर्दोष आहेस,” असे म्हणतो त्याला लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्याचा धिक्कार करतील.
25 but it will go well for those who convict the guilty, and a rich blessing will come upon them. परंतु जे लोक दोषी मनुष्याला दोषी ठरवतील, आणि त्यांच्यावर विपुल आशीर्वाद येईल.
26 An honest answer is like a kiss on the lips. प्रामाणिकपणाने दिलेले उत्तर मिळणे म्हणजे ओठांवरील चुंबनासारखे आहे.
27 Prepare your work outside, get your fields ready, and after that build your house. तुझे बाहेरचे काम योग्यप्रकारे पूर्ण कर आणि तुझे शेत तयार कर; त्यानंतर, तुझे घर बांध.
28 Do not be a witness against your neighbor without cause; would you deceive with your lips? विनाकारण तुझ्या शेजार्‍याविरुद्ध साक्ष देऊ नकोस— गैरसमज करून देण्यासाठी तू तुझ्या जिभेचा उपयोग करावा काय?
29 Do not say, "I will do to him as he did to me; I will pay the man back for what he has done." असे म्हणू नकोस, “ते जसे माझ्याशी वागले आहेत तसेच मी त्यांच्याशी वागेन; त्यांनी जसे माझे केले तशीच मी त्यांची परतफेड करेन.”
30 I passed by the field of a lazy man, by the vineyard of someone lacking sense, एका आळशी मनुष्याच्या शेताच्या बाजूने मी गेलो, ज्याच्याकडे विवेकबुद्धी नाही अशा माणसाच्या द्राक्षमळ्याच्या बाजूने मी गेलो;
31 and there it was, all overgrown with thorns; the ground was covered with weeds, and its stone wall was broken down. सर्वत्र काटेरी झुडपे उगविलेली होती, आणि संपूर्ण भूमी तणाने झाकली गेलेली होती; त्याचे दगडी कुंपणही ढासळले होते.
32 Then I looked and took it to heart; I saw and received instruction. जे काही मी पाहिले त्याचा मी विचार करू लागलो आणि जे काही मी पाहिले त्यापासून एक धडा शिकलो:
33 A little sleep, a little slumber, a little folding of the hands to rest, आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती—
34 and poverty will come upon you like a robber, and scarcity like an armed man. आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल आणि सशस्त्र मनुष्याप्रमाणे गरिबी येईल.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]